नाशिक रोड : निरोगी राहायचे असेल तर स्थूलमुक्त शरीर असायला हवे. यासाठी सात्त्विक आहाराबरोबरच आपल्या दैनंदिन जीवनात आमूलाग्र बदल करणे महत्त्वाचे आहे. जागतिक स्थूलता दिन सोमवारी (ता.४) साजरा होत असल्यानिमित्त आरोग्य तज्ञांनी चांगला व्यायाम, योगा, सात्त्विक आहार, सकाळी लवकर उठण्याबरोबरच फ्री हँड एक्सरसाईज करण्याचा सल्ला दिला आहे. (nashik World Obesity Day 2024 marathi news)
स्थूलता हा सध्या जागतिक आजार बनू पाहत आहे. फास्ट फूड, जंक फूड बरोबरच आहार विहाराच्या चुकीच्या पद्धतींमुळेच स्थूलता वाढत आहे. म्हणून आरोग्य तज्ञांनी कोणत्याही प्रकारचा व्यायाम आणि फळयुक्त सात्त्विक आहार घेतल्यास स्थूलता कमी होऊन लोक दीर्घायुष्य होऊ शकतात, असा सल्ला दिला आहे.
सध्या पुरुषांबरोबरच महिलांमध्ये स्थूलता वाढत आहे. त्याची वेगवेगळी कारणे आहेत. पीसीओडीमुळे स्त्रीला अनेक शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागते. त्यातील एक महत्त्वाचे कारण म्हणजे स्थूलता आहे. पूर्वी पीसीओडी ही समस्या ३० ते ४० वयोगटातील स्त्रीयांमध्ये आढळून येत होती. आता अगदी १५ वर्षांच्या मुलींमध्येही आढळत आहे. सध्याच्या काळात वजन वाढणे ही समस्या सर्वात जास्त दिसते आहे.
स्थूलता (वजन) वाढीची कारणे
१. हार्मोनल अनियमितता
२. बसती, निष्क्रिय जीवनशैली
३. अयोग्य आहार
४. सिगारेट, दारू किंवा तत्सम व्यसन
५. सकाळी उशिरा उठणे.
६. जेवणानंतर लगेच जास्त पाणी पिणे
७. आहारात फळांचा वापर न करणे.
८. जंक फूड व तेलकट खाणे.
९. शारीरिक आणि मानसिक ताण तणाव. (Latest Marathi News)
"पुरुष आणि महिलांनी सकारात्मक जीवनशैली अंगीकारावी. यासाठी सकाळी लवकर उठणे, कोणत्याही प्रकारचा एक तास व्यायाम करणे, आहारात फळांचा समावेश करून ताणविरहित जीवन जगणे महत्त्वाचे आहे. यासाठी वजन जादा प्रमाणात वाढत असल्यास वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करणे गरजेचे आहे."- अश्विनी चौमाल, स्त्री आरोग्य समुपदेशक
"पीसीओडी आणि लठ्ठपणाचा त्रास असणाऱ्यांनी केवळ नैसर्गिक उपायांवर अवलंबून राहणे फायदेशीर नाही. त्यांच्यासाठी जीवनशैलीत बदल करणेही गरजेचे आहे. सोबतच औषधोपचारांची मदत घेणे गरजेचे आहे. त्यावर उपचार न केल्यास स्थिती हाताबाहेर जाऊ शकते. परिणामी महिलांमध्ये बाळ होण्यामध्ये दोष किंवा इतर व्याधी जडू शकतात."
- डॉ. प्रशांत पुरंदरे, स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र तज्ञ
"आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर रोज किमान ४५ मिनिटे व्यायाम करणे गरजेचे आहे. त्यात जिम, योगा, धावणे, पळणे, पोहणे, झुंबा यांचा वापर हितावह राहील. आहारात दिवसभरातून एकवेळ तरी फळांचा समावेश हवा. वजन नियंत्रित ठेवल्यास संभाव्य आजारांना रोखता येऊ शकते, यासाठी सकाळी लवकर उठून व्यायाम करणे आवश्यक आहे."
- चैताली पाटील (जिम ट्रेनर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.