World Translation Day : अनुवादातून वैचारिक देवाण-घेवाण! महत्त्व वाढल्याने अनुवादक, प्रकाशकांना चांगले दिवस

Latest Nashik News : अनुवादन म्हणजे प्रतिभावान लेखकाने लिहिलेला मजकूर भाषांतरित करणे म्हणजे अनुवाद असा काहीसा समज होता. परंतु आता अनुवादकाचे महत्त्व वाचक आणि प्रकाशकांना समजल्याने अनुवादकाला चांगले दिवस आले आहेत.
World Translation Day
World Translation Dayesakal
Updated on

नाशिक : जगभरातील साहित्य, कला, संस्कृती, चित्रपट जाणून घेण्यासाठी ‘अनुवाद’ महत्त्वाचे माध्यम आहे. १५-२० वर्षांपूर्वी खरं तर अनुवादक उपेक्षित जमात होती. लेखकाच्या जिवावर जगणारी परोपकारी जमात. अनुवादन म्हणजे प्रतिभावान लेखकाने लिहिलेला मजकूर भाषांतरित करणे म्हणजे अनुवाद असा काहीसा समज होता. परंतु आता अनुवादकाचे महत्त्व वाचक आणि प्रकाशकांना समजल्याने अनुवादकाला चांगले दिवस आले आहेत. (World Translation Day 2024)

अनुवाद करणे हा छंद आहे. जो मूळ प्रतिकृतीला कोणताही धक्का न पोचवता लेखकाचे भाव वाचकांपर्यंत पोचविण्याचे काम करतो. ओटीटी माध्यमामुळे जगभरातील चित्रपटांची ओळख प्रेक्षकांनी झाली. दाक्षिणात्य चित्रपट असो वा इतर देशातील वेबसिरिज, चित्रपट सबटायटल्स आणि डबिंगमुळे बघायला मिळू लागले.

वास्तविक अनुवाद करताना दोन्ही भाषांवर पकड असायली हवी, ज्या भाषेत अनुवाद होतोय ती काकणभर जास्तच यायला हवी. वाचकाला आपण अनुवादित केलेले पुस्तक वाचतोय असे न वाटता इतके ते नैसर्गिक वाटले पाहिजे. शब्दाला पर्यायी शब्द न देता वाचकापर्यंत लेखकाचे भाव पोचले पाहिजे. (latest marathi news)

World Translation Day
Baban Shinde Meet Sharad Pawar: अजितदादांचा आमदार पवारांच्या भेटीला, बबन शिंदे तुतारी फुंकणार?

का साजरा केला जातो दिन

बायबलचे अनुवादक सेंट जेरोम यांच्या स्मरणार्थ जागतिक अनुवाद दिन साजरा केला जातो. जगभरातील प्रत्येक भाषा शिकणे शक्य नसल्याने अनुवादामुळे समजणे सहज शक्य आहे. १९५३ साली इंटरनॅशनल फेडरेशन फॉर ट्रान्सलेटर्स स्थापनेपासून अनुवाद दिन साजरा करण्यास सुरवात झाली.

"अनुवादकाला पूर्वीपेक्षा चांगले दिवस आले पण, पूर्वीच्या तुलनेने अनुवादनाचा दर्जा ढासळला आहे. बाजारात उपलब्ध असलेले अनुवाद तंत्रज्ञानाचा उपयोग करून केलेले दिसते जे भाषांतर वाटत नाही. साधे, सोपे, सरळ मराठी शब्द न वापरता इंग्रजी शब्दांचा वापर वाढला आहे. मातृभाषा जगवायची असेल तर, इंग्रजी शब्दांचा वापर न करता मराठी शब्दच वापरले गेले पाहिजेत."- अभय सदावर्ते, अनुवादक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (चष्मा लावलेले)

"जागतिकीकरणामुळे जगभरातले साहित्य मराठीत येऊ लागले आहे. पूर्वी फक्त शब्दकोश वापरले जात होती, आता इंटरनेटमुळे काम सुलभ झाल्याने अनुवादकांची संख्या वाढली आणि त्यांच्या कक्षा रुंदावल्या आहेत. अनुवादकाची पुस्तके आता वाचकांची वैचारिक भूक भागवत आहेत."- विलास पोतदार, प्रकाशक, वैशाली प्रकाशन (ब्लॅक कोट)

World Translation Day
Mohanrao Jagtap : उमेदवारी देणाऱ्या पक्षात प्रवेश करणार; भाजप नेते मोहनराव जगताप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.