Nashik Hanuman Jayanti : प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या पुण्यनगरीत, त्र्यंबकेश्वर येथील अंजनेरी पर्वतावर भव्य स्वरूपात हनुमान जयंती उत्सव पार पडणार आहे. या अंतर्गत हनुमान जन्मस्थान संस्थानतर्फे जगातील सर्वांत मोठा महाआरती सोहळा होईल. हनुमान जयंतीनिमित्त २३ एप्रिलला सकाळी पावणेदहाला भाविकांच्या उपस्थितीत महाआरती केली जाणार आहे. (Nashik Worlds biggest Hanuman Jayanti in Anjaneri news)
अंजनेरी पर्वतावर हनुमानाच्या जन्मस्थानी दरवर्षी लाखो भाविक श्रद्धेने दर्शनासाठी उपस्थित राहत असतात. यंदाही सालाबादप्रमाणे हनुमान जयंती सोहळ्याचे आयोजन केले आहे. या वेळी नाशिक व महाराष्ट्रातील हनुमान भक्तांनी, साधू- संत- महंत, आखाड्यांचे प्रमुख यांनी भारतातीलच नव्हे, तर जागतिक स्तरावरील सर्वांत मोठा महाआरतीचा सोहळा आयोजित केला आहे.
हनुमान जयंतीला हनुमान जन्मस्थळ अंजनेरी पर्वतावर हा सोहळा होईल. या महाआरती सोहळ्यास त्र्यंबकेश्वरमधील सर्व गावांचा सहभाग असणार आहे. महाआरती सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होत, इतर कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन हनुमान भक्त परिवाराने केले आहे.
महाआरतीला सर्व स्तरांवरून सहभाग
हनुमान जयंतीनिमित्त २३ एप्रिलला सकाळी पावणेदहाला महाआरतीचा सोहळा पार पडेल. या वेळी हनुमान भक्त परिवारासह साधू, संत, महंत तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.
विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन
अंजनेरी पर्वताचे पावित्र्य राखले जावे, असा संदेश देण्यासाठी स्थानिक गावकरी व स्वयंसेवक यांच्यामार्फत स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. या वेळी पर्वत व परिसरात स्वच्छता केली जाईल. (latest marathi news)
अयोध्येच्या धर्तीवर व्हावा अंजनेरीचा विकास
यंदा अयोध्येत राम मंदिर साकारले आहे. या रामराज्यात श्रीराम भक्त हनुमान यांचे जन्मस्थान सुख-सुविधांपासून वंचित राहिले आहे. त्यामुळे अयोध्येच्या राम मंदिराच्या धर्तीवर, अंजनेरी पर्वताचा तीर्थक्षेत्र म्हणून सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने हनुमान जन्मस्थान संस्थेतर्फे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. भाविकांच्या मदतीने अविरतपणे हनुमानाचे तीर्थक्षेत्र निर्माणासाठी १२ वर्षांपासून कार्य सुरू आहे. या निर्धाराचा पुनरुच्चार या सोहळ्यानिमित्त केला जाईल.
असा असेल जयंती सोहळा कार्यक्रम...
- पहाटे पाचला साधू-महंतांच्या हस्ते महायज्ञास प्रारंभ.
- दोन लाख भाविकांना हनुमान चालिसा वाटप होणार
- ध्वजारोहण सोहळ्यातून प्रसन्न होईल वातावरण
- सकाळी पावणेदहाला महाआरती सोहळा
- मारुती स्तोत्र, हनुमान आरती
- हनुमान चालिसा, हनुमान बीजमंत्राचे होणार पठण
- साधू-महंतांना भगवे वस्त्रदान, भोजनदानाचा कार्यक्रम
- भाविकांसाठी महाप्रसाद, प्राथमिक औषधोपचार व्यवस्था
"जगातील सर्वांत मोठा महाआरती सोहळा हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेरी पर्वतावर आयोजित केला आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून, या भव्य जयंती सोहळ्यात भाविकांनी सहभागी व्हावे."- प्रशांत गडाख, अध्यक्ष, हनुमान जन्मस्थान संस्था
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.