Nashik News : समन्यायी पाणीवाटपाच्या आधारे जायकवाडी धरण १५ ऑक्टोबरपर्यंत ६५ टक्के भरल्यास नाशिकच्या धरणांमधून भविष्यात पाणी सोडण्याची आवश्यकता राहणार नाही. सद्यःस्थितीला पुराच्या पाण्यामुळेच हे धरण ६० टक्क्यांपर्यंत भरले असून, पुढील चार दिवसांत जायकवाडी धरण ६५ टक्क्यांपर्यंत पोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी सोडण्यावरून मराठवाडा विरुद्ध नाशिकमध्ये होणारा संघर्ष यंदा होणार नाही, अशी शक्यता वर्तविली जाते. (Worries of citizen solved will reach 65 percent by August 31 )