Nashik Police Recruitment : पोलीस भरतीसाठीची लेखी परीक्षा 7 जुलैनंतर! राज्यभरातील मैदानी चाचणी अंतिम टप्प्यात

Nashik News : गेल्या १९ तारखेपासून मैदानी चाचणी घेतली जात असून ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
Nashik Police Recruitment
Nashik Police Recruitmentesakal

Nashik Police Recruitment : महाराष्ट्र पोलीस दलातील रिक्त शिपाई पदांसाठी भरतीची प्रक्रिया राज्यात सुरू आहे. त्यासाठी गेल्या १९ तारखेपासून मैदानी चाचणी घेतली जात असून ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. (Nashik Written Exam for Police Recruitment After 7th July)

नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील शिपाईपदाच्या रिक्त ११८ जागांसाठी ५ हजार ५९० पुरुष, २ हजार १२५ महिला व दोन तृतीयपंथी उमेदवारांनी अर्ज केले आहेत. गेल्या १९ तारखेपासून मीनाताई ठाकरे स्टेडिअमवर मैदानी चाचणी सुरू आहे. त्याचप्रमाणे, नाशिक ग्रामीणच्या रिक्त ३२ जागांसाठी मैदानी चाचणी गेल्या आठवड्यातच पूर्ण झालेली आहे.

शहर आयुक्तालयाने गेल्या आठवडाभरातून मैदानी चाचणीतील उमेदवारांचे गुण जाहीर केलेले आहेत. त्यासंदर्भात ७ उमेदवारांनी गुणांबाबत हरकत घेतल्याने आयुक्तालयाने सुधारित गुणवत्ता यादी जाहीर केली. तर या आठवड्यात २९ तारखेला मैदानी चाचणी पूर्ण होऊन ३० जून वा १ जुलै रोजी मैदानी चाचणीचा अंतिम निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. (latest marathi news)

Nashik Police Recruitment
Dhule Police Recruitment : महिला पोलिस भरती चाचणीत 321 पात्र, 60 उमेदवार बाद!

राज्यभरात सुरू असलेल्या मैदानी चाचणीही जून अखेर पूर्ण होऊन अंतिम गुणफलक जाहीर केले जातील. त्यामुळे लेखीसाठी पात्र ठरलेल्यांना लेखी परीक्षेचे वेध लागतील. त्यानुसार, ७ जुलैनंतर राज्यभरात एकाचवेळी लेखी परीक्षा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

'विधानसभे’ला होणार मदत

जुलैमध्ये लेखी परीक्षा होऊन अखेरपर्यंत निकाल जाहीर करून ऑगस्टपासून निवड झालेल्यांच्या प्रशिक्षणाला प्रारंभ करण्याचा पोलिस प्रशासनाचे नियोजन आहे. असे झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत या प्रशिक्षणार्थींचे दोन-तीन महिन्याचे प्रशिक्षण झालेले असेल. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या प्रशिक्षणार्थींचा बंदोबस्तासाठी वापर करता येणार आहे.

Nashik Police Recruitment
Nashik Police Recruitment: मुसळधार पावसानंतरही ‘भरती’ मात्र सुरळीत! सिंथेटिक ट्रॅकवर भरतीचे नियोजन यशस्वी; उमेदवारांना दिलासा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com