SPPU News : ‘एलएलबी’च्या विद्यार्थ्यांना ‘बीएसएल’ची प्रश्नपत्रिका! विद्यार्थ्यांचा मनस्‍ताप

Nashik News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत सुरू असलेल्‍या विधी अभ्यासक्रमाच्‍या लेखी परीक्षेत मंगळवारी (ता. ४) गोंधळ झाला.
students
students esakal
Updated on

Nashik News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत सुरू असलेल्‍या विधी अभ्यासक्रमाच्‍या लेखी परीक्षेत मंगळवारी (ता. ४) गोंधळ झाला. एलएलबीच्‍या काही विद्यार्थ्यांना चुकून बीएसएलची प्रश्‍नपत्रिका दिल्‍याचे समोर आले आहे. अर्धा तासानंतर हा प्रकार लक्षात आल्‍यानंतर चुकीची दुरुस्‍ती करण्यात आल्‍याचे विद्यार्थ्यांचे म्‍हणणे आहे. (some LLB students got BSL question paper by mistake)

वेळ वाया गेल्‍याने या विषयात अनुत्तीर्ण होण्याची वेळ ओढवणार असल्‍याची भीती विद्यार्थी व्‍यक्‍त करत आहेत. शहरातील नवजीवन विधी महाविद्यालयात हा प्रकार घडला आहे. एलएलबीच्‍या तृतीय वर्षासाठी ‘क्रिमिनल प्रोसिजर लॉ’ या विषयाचा पेपर मंगळवारी नियोजित होता. मात्र परीक्षा केंद्रातील पर्यवेक्षकांच्‍या चुकीमुळे एका वर्गखोलीतील काही विद्यार्थ्यांना बीएसएल (५ वर्षे कालावधीचा एलएलबी) या अभ्यासक्रमाच्‍या पाचव्‍या सत्रातील प्रश्‍नपत्रिका देण्यात आली.

परीक्षा सुरू होऊन अर्धा तासानंतर यासंदर्भात विद्यार्थ्यांना हा प्रकार लक्षात आला. यासंदर्भात संबंधितांना विचारणा केली असता, पर्यवेक्षिका यांनी विद्यार्थ्यांनाच फटकारल्‍याचे तक्रारकर्त्या विद्यार्थ्यांचे म्‍हणणे आहे. दरम्‍यान, अर्धा तासानंतर सुधारित प्रश्‍नपत्रिका दिली तरी वेळ मात्र वाढवून न दिल्‍याने मर्यादित वेळेत जमेल तितका पेपर सोडविण्याची वेळ ओढावल्‍याची तक्रारही या विद्यार्थ्यांनी केली आहे. (latest marathi news)

students
Nashik Lok Sabha Election 2024 Result : भगरे यांच्या विजयाने ‘राष्ट्रवादी’चा वनवास संपला! पहिल्या निवडणुकीत भगरे दिल्लीत

परीक्षा पुन्हा घ्यावी

या गोंधळात विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेला. त्‍यांना उत्तरे लिहिण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. त्‍यामुळे या गोंधळाचे बळी ठरलेले सर्व विद्यार्थी या विषयाच्‍या पेपरला अनुत्तीर्ण होऊ शकतात, अशी भीती या विद्यार्थ्यांनी व्‍यक्‍त केली आहे. त्‍यामुळे पुन्‍हा एकदा परीक्षा घेत विद्यार्थ्यांना संधी देण्यात यावी, अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे.

पाच मिनिटांत केली सुधारणा

यासंदर्भात संबंधित महाविद्यालय प्रशासनाकडे चौकशी केली असता, सुधारित प्रश्‍नपत्रिका अवघ्या पाच मिनिटांमध्ये उपलब्‍ध करून दिल्‍याचा दावा केला. संबंधित पर्यवेक्षिका या विधी शाखेतील नव्‍हत्‍या. त्‍यामुळे त्‍यांना याबाबत माहिती नव्‍हती. परंतु प्रश्‍नपत्रिका नीट बघून घेण्याविषयी सूचना केल्‍या होत्‍या.

परीक्षा सुरू झाल्‍यावर पाच मिनिटांमध्येच ही बाब लक्षात आल्‍यानंतर तातडीने विद्यार्थ्यांना सुधारित प्रश्‍नपत्रिका दिल्याचे व नुकसान झालेला वेळ अतिरिक्‍त दिल्‍याचेही सांगण्यात आले. अवघ्या चार-सहा विद्यार्थ्यांसोबतच हा प्रकार घडल्‍याचा दावाही महाविद्यालयातर्फे करण्यात आला आहे.

students
Nashik Lok Sabha Election 2024 Result : राजाभाऊ वाजेंची विजयी मिरवणूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.