Yashwantrao Chavan Jayanti : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार : यशवंतराव चव्हाण

Yashwantrao Chavan Jayanti : संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीआधी यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राची जडणघडण केली.
Architect of Modern Maharashtra: Yashwantrao Chavan
Architect of Modern Maharashtra: Yashwantrao Chavanesakal
Updated on

Yashwantrao Chavan Jayanti : संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीआधी यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राची जडणघडण केली. महाराष्ट्राला विकास, उत्कर्षाची झळाळी दिली, त्यामुळेच ते आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार ठरतात. त्‍यांनी पंडित नेहरूंना महाराष्ट्र व गुजरात भाषिक राज्य अटळ असल्याचे मुत्सद्देगिरीने पटवून दिले, त्यामुळे ते मुत्सद्दी राजकारणी ठरतात. समाजहित, राष्ट्रहिताला प्राधान्य देताना कायम जीवन मूल्यांची जोपासना केली.- ॲड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्र. (nashik Yashwantrao Chavan Jayanti Architect of Modern Maharashtra marathi news )

आईला शाळा मानणारे यशवंतराव हे श्रेष्ठ मातृभक्त होते. शालेय जीवनात आईच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेत लिंबांच्या झाडावर तिरंगा झेंडा फडकवताना, पोलिसांची माफी मागण्यास नकार दिला. बिकट परिस्थितीत जीवन कंठणाऱ्या या कुटुंबाला आई विठाबाईने सातत्याने सावरले.

यशवंतरावांनी जीवनाला कला, पावित्र्याचा संगम मानले. कराड गावाने त्यांच्यावर विद्याव्यासंग, ज्ञानोपासना, समाजात मिळून मिसळून राहणे, चर्चा, व्याख्याने आदींचे संस्कार केले. लोकशाहीचा अर्थ केवळ शासनाचा प्रकार असा होत असल्‍यास अशा लोकशाहीसंबंधी बिलकूल आकर्षण वाटणार नाही, असे परखडपणे बोलणारे चव्हाणसाहेब धुरंधर निरपेक्ष राजकारणी होते. १९६२ मध्ये चीनसोबतच्‍या युद्धात भारताचा पराभव झाला होता.

पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्याकडे देशाच्या संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी दिली. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ‘हिमालयाच्या मदतीला सह्याद्री आला’ अशीच प्रतिक्रिया उमटली. यशवंतरावांनी तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांची बैठक घेत जबाबदारी गंभीरपणे पत्करली. परिणामी १९६५ च्या भारत-पाक युद्धात भारताने मोठे यश मिळविले. (latest marathi news)

Architect of Modern Maharashtra: Yashwantrao Chavan
Yashwantrao Chavan : ‘मी, समुद्र आणि सावरकर’; यशवंतराव रत्नागिरीला चालत गेले तो दिवस

यातून त्यांच्या प्रशासन व्यवस्थेची जाण, नेतृत्व, प्रचंड कार्यक्षमतेची प्रचिती येते. १९६६ मध्ये नाशिकहून लोकसभेवर बिनविरोध निवडून आले. त्यानंतर त्यांनी भारताचे गृहमंत्रिपद भूषविले. या काळात बंगालमधील नक्षलवाद्यांचा बीमोड केला. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमी त्यांच्याच कारकिर्दीत निर्माण झाली.

आर्थिक मंदीच्या काळात त्यांनी अर्थमंत्री पदाची (१९६९) जबाबदारी लीलया पेलली. १९७०-७१ ची महागाई रोखण्यासाठी, ‘गरिबी हटाव’ घोषणेच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण, संस्थानिकांचे तनखे रद्द, कमाल जमीन धारणा कायदा अस्तित्वात आणून क्रांतिकारी अर्थकारण केले.

ते द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले, त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ऐन भरात होती. १०५ हुतात्म्यांनी महाराष्ट्रासाठी प्राणांचे बलिदान दिले होते. तत्कालीन परिस्थिती, जनमानस आणि काळाची गरज लक्षात घेतली. इंदिरा गांधी यांच्यामार्फत पंडित नेहरूंसमोर सर्व वास्तव मांडत चातुर्य आणि संयमाने महत्त्वाची भूमिका निभावली.

Architect of Modern Maharashtra: Yashwantrao Chavan
Yashwantrao Chavan : महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेनं नेण्याचं काम यशवंतरावांचं; राष्ट्रवादी, भाजपकडून अभिवादन

१ मे १९६० रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली. कित्येक वर्षे एकत्र राहिलेली महाराष्ट्र व गुजरात ही राज्ये वेगळी झाली. मराठी भाषकांचे राज्य व्हावे, ही जनतेची इच्छा फलद्रूप झाली. त्यामुळे महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश आणण्याचे श्रेय यशवंतरावांकडे जाते. ‘सक्तीचे शिक्षण शासनाने द्यावे आणि जनतेने घ्यावे’ अशा प्रकारचे शिक्षण देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र निर्मितीनंतर केला.

आयुष्याची उणीपुरी ४० वर्षे राजकारणात अमीट ठसा उमटविणाऱ्या यशवंतरावांनी परराष्ट्रमंत्री (१९७४), विरोधी पक्षनेता (१९७७), वित्त आयोगाचे अध्यक्ष, उपपंतप्रधान या सर्वच पदांना पूर्णता न्याय दिला. त्‍यांनी कृष्णाकाठ, सह्याद्रीचे वारे, शिवनेरीच्या नौबती, ऋणानुबंध, युगांतर आदी ग्रंथांद्वारे साहित्यिक म्हणून अस्तित्व निर्माण केले.

ते साहित्याचे मोल शस्त्रापेक्षाही जास्त मानत. त्‍यांच्या पत्नी वेणूताई धार्मिक वृत्तीच्या, श्रद्धाळू होत्या. त्या यशवंतरावांच्या केवळ सहचारिणी व सल्लागारही होत्या. आदर्श राजकीय विवेकी नेता, व्यासंगी, सुसंस्कृत समाजपुरुष, रसिक साहित्यिक, विज्ञानवादी विचारवंत, संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार असे अष्टपैलू यशवंतराव चव्हाण खऱ्या अर्थाने महाराष्ट्र, भारताचे भाग्यविधाते होते.

Architect of Modern Maharashtra: Yashwantrao Chavan
Yashwantrao Chavan : यशवंतरावांच्या या निर्णयांनी महाराष्ट्रासाठी केलं स्टिअरींग व्हीलचं काम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.