Onion Farmer Protest : खासगी बाजार समितीत सुरु झालेल्या कांदा खरेदी विरोधात पिंपळगाव बाजार समितीचे संचालक यतीन कदम यांनी आक्रमक भूमिका घेत माथाडी कामगारांना घेऊन धरणे धरले. त्यामुळे खासगी बाजार समित्यांची कांदा खरेदी विषयात माथाडी कामगारांची एन्ट्री झाली. पिंपळगाव बाजार समितीत आमदार सभापती दिलीप बनकर यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळातील शेतकरी व व्यापारी,मापारी प्रतिनिधीची बैठक झाली. मात्र त्यात कुठलाही तोडगा न निघाल्याने यतीन कदम यांनी बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयातच शेतकरी व हमाल-मापारी सोबत धरणे आंदोलन केले. (nashik Pimpalgaon Market Committee took workers and staged protest against onion purchase )
खासगी समित्यांचा निषेध
शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केल्यानंतर लेव्ही कपात न करण्याच्या निर्णयावरून सुरु असलेल्या वादात १३ दिवसांपासून पिंपळगांव बाजार समितीत कांदा लिलाव ठप्प झाले होते. काल मंगळवारी (ता.९) कांदा व्यापाऱ्यांनी सुरु केलेल्या बाफणा ॲग्रो मार्केट या खासगी बाजार समिती विरोधात आंदोलन सुरु केले. पिंपळगांव बाजार समितीत सुरू झालेले आंदोलन आज बुधवारी (ता.१०) दुपारनंतर बाफणा ॲग्रो मार्केट या खाजगी बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर धडकले. व्यापाऱ्यांच्या भूमिकेचा निषेध करीत, कदम तसेच हमाल-मापारी कामगारांनी निषेध केला. (latest marathi news)
''शासनाच्या नियंत्रणाखाली बाजार समितीऐवजी खासगी बाजार समितीत कांदा खरेदीची व्यापाऱ्यांची भूमिका आडमुठेपणाची आहे. तूर्तास हा शेतकऱ्यांनना दिलासा वाटत असला तरी शासकीय समित्या कमकुवत करून खासगी बाजार समित्यांना सक्षम करण्याचा हा डाव आहे. बाजार समितीत खरेदी होत नाही तोपर्यंत शेतकरी व माथाडी कामगारांच्या हितासाठी आंदोलन सुरू ठेवण्यात येईल.''- यतीन कदम (संचालक,बाजार समिती,पिंपळगांव बसवंत)
''लेव्हीचे प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे. शासनाच्या निर्णयानुसार हमाली,तोलाई,वारई कपात बंधनकारक असताना व्यापाऱ्यांनी खासगी बाजार समित्या पोसण्याचा डाव सुरु केला आहे.यातून हजारो माथाडी कामगारांचा रोजगार हिरावला जाणार आहे.''- दीपक मोरे(माथाडी कामगार).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.