Nashik YCMOU Admission : मुक्‍तच्‍या कृषी अभ्यासक्रमाच्या अर्जाची या तारखेपर्यंत मुदत; जाणुन घ्या वेळापत्रक

YCMOU Admission
YCMOU Admission esakal
Updated on

Nashik YCMOU Admission : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठातील कृषी अभ्यासक्रमांना शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रवेशाची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

इच्‍छुक व पात्र विद्यार्थ्यांना येत्‍या सोमवार (ता. १९)पर्यंत नोंदणी करून प्रवेशप्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

विद्यापीठातर्फे प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जात असून, विद्यार्थ्यांसाठी आणि कृषी शिक्षण केंद्रांसाठी सूचना जारी केलेली आहे. (Nashik YCMOU Admission Free Agriculture Course Application Deadline is 19th June news)

विद्यापीठाच्‍या प्रमाणपत्र शिक्षणक्रम, पदविका शिक्षणक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवार (ता.१३) पासून सुरू झालेली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी कृषी शिक्षणक्रम माहिती पुस्तिकेसह अन्‍य माहिती वाचून घ्यावी.

अर्ज भरताना वैयक्‍तिक माहितीसह आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असेल, तर त्‍याच्‍याशी संबंधित कागदपत्रांची सुस्‍पष्ट प्रत (स्‍कॅनकॉपी) अपलोड करावी लागणार आहे. प्रथमच नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला यूझर आयडी व पासवर्ड काळजीपूर्वक जनत करून ठेवावा, अशा सूचना विद्यापीठातर्फे दिलेल्‍या आहेत.

विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्‍त अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. परंतु गुणवत्तायादी जाहीर झाल्‍यानंतर कुठल्‍याही एकाच कृषी अभ्यासक्रमास प्रवेश घेता येईल, असे विद्यापीठाने स्‍पष्ट केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

YCMOU Admission
Vocational Courses Admission : विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! कॅप राउंडच्‍या प्रक्रियेला या तारखेपासुन सुरुवात

...असे आहे प्रवेशाचे वेळापत्रक

- प्रवेश अर्ज भरण्याची मुदत --------------- १९ जूनपर्यंत

- प्रथम फेरी गुणवत्तायादी प्रसिद्धी ----------- २६ जून

- यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी ------- २७ जून ते २ जुलै

- दुसरी गुणवत्तायादी प्रसिद्धी -------------- ७ जुलै

- यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी ----- ७ ते ११ जुलै

- शिल्लक जागांची माहिती प्रसिद्धी -------- १४ जुलै

- शिल्लक जागांवर प्रवेश -------------- १७ व १८ जुलै

(प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्‍य)

- पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज ----- १ ते १० ऑगस्‍ट

- कृषी शिक्षण केंद्रांना पुस्तके वितरण ----- १ ते १० ऑगस्‍ट

YCMOU Admission
Nashik 11th Admission : अकरावी प्रवेशासाठी शिक्षण विभागाकडून मुदतवाढ; जाणुन घ्या सुधारित वेळापत्रक

३५ हजार जागांवर प्रवेश

राज्‍यातील विविध दहा विभागीय केंद्रांतर्गत येणाऱ्या कृषी शिक्षण केंद्रांवर एकूण ३५ हजार ४४० जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत. यामध्ये माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र (तीन हजार २००), कृषी अधिष्ठान अभ्यासक्रम (चार हजार ८८० आणि तीन हजार ४०), उद्यानविद्या पदविका अभ्यासक्रम (पाच हजार ४०),

कृषी व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन पदविका (चार हजार ९६०), कृषी पत्रकारिता पदविका (चार हजार ९६०), फळबागा उत्‍पादन पदविका (तीन हजार १२०), भाजीपाला उत्‍पादन पदविका (तीन हजार १२०), फूलशेती व प्रांगण उद्यान पदविका (तीन हजार १२०) या अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे.

पदवीला प्रवेश नाहीच

यापूर्वी विद्यापीठातर्फे पदवी अभ्यासक्रम चालविला जात होता; परंतु ‘यूजीसी’च्‍या २० मार्च २०१९ च्‍या पत्रानुसार कृषी विज्ञान विद्या शाखेअंतर्गत कृषी विषयातील पदवी शिक्षणक्रम (बी.एस्सी. ॲग्री आणि बी.एस्सी. हॉर्टिकल्‍चर) बंद केले आहेत.

त्‍यामुळे येत्‍या शैक्षणिक वर्षातही पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिले जाणार नाहीत. दरम्‍यान, शैक्षणिक वर्ष २०१९ पूर्वी मुक्‍त विद्यापीठाच्‍या पदवीला प्रवेश घेतलेल्‍या विद्यार्थ्यांसाठी या दोन्‍ही पदवी शिक्षणक्रम ग्राह्य धरण्यात येतील, असे विद्यापीठाने स्‍पष्ट केले आहे.

YCMOU Admission
Inspirational News : गोळा नव्हता म्हणून दगडाने केला सराव... दिव्यांग जना टोपलेंचे राष्ट्रीय स्पर्धेत ‘सुवर्ण’ यश!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.