Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहिण योजना’ यशस्वी राबविण्यासाठी येवल्यात 28 केंद्र! समीर भुजबळांकडून आढावा

Nashik News : महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची घोषणा करण्यात आली.
Former MP Sameer Bhujbal interacting with activists at Liaison Office in Yeola
Former MP Sameer Bhujbal interacting with activists at Liaison Office in Yeolaesakal
Updated on

येवला : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने येवला मतदारसंघातील प्रमुख गावांमध्ये विविध ठिकाणी १८ केंद्र सुरू केले आहे. तसेच, मतदारसंघातील सर्व सेतू केंद्रांवर अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कामी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना माजी खासदार समीर भुजबळ यांनी केल्या. (28 centers have come to successfully implement for Ladki Bahin Yojana)

महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण’ योजनेची घोषणा करण्यात आली. या पार्श्‍वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार सोमवारी (ता. १) येवला संपर्क कार्यालयात सदर योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी समीर भुजबळ यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत आढावा बैठक घेतली.

मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकारातून येवला मतदारसंघात १ जुलै ते १५ जुलै २०२४ यादरम्यान विशेष अर्ज भरण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मतदारसंघातील प्रमुख गावांमध्ये विविध ठिकाणी १८ केंद्र सुरू केली आहेत. तसेच, मतदारसंघातील सर्व सेतू केंद्रांवर अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. (latest marathi news)

Former MP Sameer Bhujbal interacting with activists at Liaison Office in Yeola
Nashik News : मध्यप्रदेश सरकारकडून सीमेवरील नाके बंद!

या ठिकाणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वतः लक्ष देऊन जास्तीत जास्त महिलांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशा समीर भुजबळ यांनी केल्या. यावेळी कार्याध्यक्ष ज्ञानेश्‍वर शेवाळे, शहराध्यक्ष दीपक लोणारी, राजेश भांडगे, भगवान ठोंबरे, सचिन कळमकर, नवनाथ काळे, संतोष खैरनार.

पांडुरंग राऊत, भूषण लाघवे, संजय पगार, भाऊसाहेब धनवटे, विकी बिवाल, सुमित थोरात, गोटू मांजरे, सचिन सोनवणे, मलिक मेंबर, विशाल परदेशी, गणेश गवळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Former MP Sameer Bhujbal interacting with activists at Liaison Office in Yeola
Nashik Junior Collage Admission : पहिल्‍या फेरीत 6 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश; दुसऱ्या फेरीची उद्यापासून प्रक्रिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com