Nashik Crime News : सोन्याचे दागिने, शेतीपंप चोरणाऱ्या सराईतांना अटक! येवला पोलिसांची कामगिरी

Nashik News : येवला तालुक्यात विविध ठिकाणी जबरी चोरी, चैन स्नॅचिंग, घरफोडी तसेच शेतीपंप चोरी व बकऱ्या चोरी करणाऱ्या टोळीला तालुका पोलिसांनी जेरबंद केले आहे.
The police detained the suspect in eleven different crimes.
The police detained the suspect in eleven different crimes.esakal
Updated on

येवला : तालुक्यात विविध ठिकाणी जबरी चोरी, चैन स्नॅचिंग, घरफोडी तसेच शेतीपंप चोरी व बकऱ्या चोरी करणाऱ्या टोळीला तालुका पोलिसांनी जेरबंद केले आहे. अटक केलेल्या या टोळीतील सहा संशयित आरोपींकडून ११ गुन्हे उघडकीस आले असून २ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Yeola Crime innkeepers who stole gold ornaments farm pumps were arrested)

अनकाई येथे रेल्वे पुलाखाली रात्रीच्या सुमारास बँक कर्मचाऱ्याला मारहाण करुन ६६ हजार ६९० रुपये, ४ हजार रुपये किमतीचा मोबाईल लंपास केला होता. पोलिस या गुन्ह्याचा तपास करत असताना हरिभाऊ ऊर्फ पिंट्या कडू पवार (रा. रहाडी), विजय भाऊसाहेब माळी (रा. भारम), अरुण रतन पवार, शिवाजी आबासाहेब ठाकरे.

राजू काळू सुरासे, अण्णा शिवाजी पवार (सर्व रा. रहाडी) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी विविध ठिकाणी चोऱ्या केल्याचे कबूल केले. तालुक्यातील गवंडगाव येथे एका महिलेची ३ लाख २७ हजार रुपये किमतीची गळ्यातील सोन्याची चैन, डोंगरगाव येथे बंद घराचे कडीकोंडा तोडून घरातील २२ हजार रुपये रोख रक्कम व ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने.

सहा ठिकाणी शेती पंप चोरी (इलेक्ट्रीक मोटार) मुखेड, रहाडी, मानोरी तसेच वैजापूर पोलिस स्टेशन हद्दीत शेती पंप चोरी केल्याची कबुलीही या टोळीने दिली असून त्यांच्याकडून १ लाख १० हजार रुपये किमतीचे ८ शेती पंप जप्त केले आहे. आरोपींनी चोरी केलेले शेती पंप दादासाहेब भोंगळ (रहाडी), अकील शेख, कादर पठाण (लोणी खुर्द, ता. वैजापूर) यांना विकले असल्याचे कबूल केले. (latest marathi news)

The police detained the suspect in eleven different crimes.
Crime : सुखी संसाराला संशयाचे ग्रहण! देहूरोड परिसरात विवाहितेच्या खुनाच्या लागोपाठ दोन घटना

तालुका पोलिस स्टेशन हद्दीत मानोरी व राजापुर येथी बकऱ्या चोरीचे २ गुन्हे दाखल असून सदर गुन्ह्याचे तपास करीत असताना याच आरोपींनी बकऱ्या चोरी केल्याची कबुली दिली आहे.आरोपींची या बकऱ्या अंदरसुल आठवडे बाजारात विकल्या असून बकऱ्या विकत घेणाऱ्या इसमांचा शोध घेऊन मुद्देमाल जप्त करणार असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेले ११ गुन्हे उघडकीस आले असून अटक संशयित यांच्याकडून ११ इलेक्ट्रीक मोटार पंप, गुन्ह्यात वापरलेल्या तीन दुचाकीसह २ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तालुका पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सागर कोते, हर्षवर्धन बहीर, प्रल्हाद पवार, राजेंद्र केदारे, राजेंद्र पाटील, सचिन वैरागर, ज्ञानेश्वर पल्हाळ, राजेंद्र बिन्नर, आबा पिसाळ, मुकेश निकम, दिनकर पारधी, पंकज शिंदे, गौतम मोरे, सागर बनकर, गणेश बागूल, गणेश सोनवणे, नितीन पानसरे, श्‍याम थेटे, योगेश वायभासे यांनी ही कारवाई केली.

The police detained the suspect in eleven different crimes.
Nashik Crime News : पैशांच्या वादातून मालेगावला गोळीबार! एक जखमी, गावठी कट्ट्यांचा वापर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.