येवला : थोड्याफार प्रमाणात बाष्पीभवन आणि मोठ्या प्रमाणात आजूबाजूंच्या विहिरीतून होणारा अनधिकृत पाणी उपसा यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावातील पाणी झपाट्याने खालावत आहे. सद्य:स्थितीत पाणीसाठवण तलावाचा तळ उघडा पडला आहे. तळाचे पाणी घेऊन पाणीपुरवठा करण्याची वेळ आल्याने पालिकेने शहराला पाच दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केल्याने नागरिकांना सहाव्या दिवशी नळाला पाणी मिळत आहे. (Nashik yeola get water every 5 days lake dries marathi news)
शहरासाठी राबविलेल्या टप्पा क्रमांक दोनच्या पाणी योजनेच्या सुमारे नव्वद एकराच्या साठवण तलावात चार मीटर (५० दशलक्ष घनफुट) इतके पाणी साचते. या तलावात जानेवारी महिन्यात दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात पालखेड कालव्याच्या सिंचनाच्या आवर्तनातून येवला व मनमाडच्या साठवण तलावात पिण्यासाठी पाणी दिले होते.
शहराच्या टप्पा क्रमांक दोनच्या साठवण तलावातून शहराला रोज ६० लाख लिटर सरासरी पाण्याची गरज असते. त्या हिशोबाने तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास पाणी तलावातून मोठ्या प्रमाणात झिरपते व बाष्पीभवन विचारात घेऊनही ५५ ते ६० दिवस पुरते. मात्र,यंदा टंचाईची दाहकता अधिक असून पाणीच नसल्याने आजूबाजूला सुमारे २०० विहिरीतून वारेमाप उपसा होतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाऊन शहरावर पाणीबाणीची परिस्थिती उद्भवली आहे.
पाण्याचा अंदाज घेऊन मागील महिनाभरापासून शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. सद्य:स्थितीत तलावाचा तळ उघडा पडला असून उरलेसुरले पाणी शुद्धीकरण करून नागरिकांना दिले जात आहे. यामुळे गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी होत आहेत.पाणीच आटल्याने आजपासून शहराला पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे.तलावातील तळाचे तसेच आजूबाजूच्या विहिरीतून हे पाणी उचलून पाणीपुरवठा करण्याची कसरत पाणीपुरवठा विभाग करत आहे. (latest marathi news)
पाणीपुरवठ्याचा कालावधी वाढणार
पालखेड डाव्या कालव्यातून पाटबंधारे विभागाने जूनपर्यंत आठ-आठ दिवसाचे केवळ दोनच आवर्तन देण्याचे नियोजन केले आहे. आता तलाव कोरडाठाक पडल्याने येवला शहरासह मनमाड शहर व मनमाड रेल्वेचे साठवण तलाव भरून देण्यासाठी पाणी आवर्तन देण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे पालिकेने केली आहे.
मात्र अजूनही एप्रिल, मे व जून हे महत्त्वाचे महिने धरणातील उपलब्ध पाण्यावर काढावे लागणार असल्याने पाटबंधारे विभागही बचत करून पाणी देत आहे. त्याचमुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पालखेड कालव्याला आवर्तन मिळण्याची शक्यता आहे. अजूनही दहा ते बारा दिवसाचा कालावधी असून वेळ पडल्यास सहा दिवसाआड देखील पाणीपुरवठा करण्याची तयारी पालिकेने केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.