Nashik News : करवसुलीसाठी पालिकेची बँड बजाओ मोहीम! येवल्यात मालमत्ता सील; अद्याप 50 टक्के थकबाकी

Nashik News : थकबाकीदारांच्या घरासमोर बँड वाजवून थकबाकी वसुली मोहीम सुरू केली आहे
Municipal employees collecting money by playing a band in front of the houses of defaulters.
Municipal employees collecting money by playing a band in front of the houses of defaulters.esakal
Updated on

येवला : मालमत्ता, पाणीपट्टीची येवलेकरांकडे सुमारे ५० टक्के वसुली बाकी आहे. यामुळे नगरपालिकेने वसुलीसाठी शहरातील चार ते पाच गाळे सील केले आहेत. थकबाकीदारांच्या घरासमोर बँड वाजवून थकबाकी वसुली मोहीम सुरू केली आहे. वसुली पथकामागे गल्लोगल्ली बघ्यांची गर्दी होत आहे. (Nashik yeola Municipal band play campaign for tax collection marathi news)

‘ब’ वर्ग दर्जा असलेल्या येथील पालिकेवर कोट्यवधीच्या आसपास कर्जाचे ओझे असून, दरवर्षी करवसुली आणि विविध माध्यमातून मिळणारे उत्पन्न पालिकेचा वर्षाचा गाडा हाकण्याचा हक्काचा फंड आहे. मार्च एन्डजवळ आला, तरी पालिकेची ५० टक्क्यांवर वसुली अडकली आहे.

शहराचा विस्तार वाढला असून, पालिकेला शहरवासीयांकडून सुमारे सहा कोटींची घरपट्टी, तर दोन कोटींची पाणीपट्टी वसूल होते. या निधीतून विकासकामांसह पालिकेच्या आर्थिक गरजा भागविल्या जातात. करवसुलीसाठी १ मार्चपासून मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोहीम सुरू आहे.

पहिल्या टप्प्यात दहाहून अधिक नळकनेक्शन तोडण्यात आले. प्रतिसाद न देणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांची नळ तोडणी, मालमत्ता सील करणे, तसेच थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल वाजविणेा सुरू करण्यात आले. आतापर्यंत सुमारे ५० टक्के वसुली झाली असून, शासनाने शंभर टक्के करवसुलीचे उद्दिष्ट न गाठल्यास पंधराव्या वित्त आयोगाचे अनुदान रोखण्याची भीती आहे.  (latest marathi news)

Municipal employees collecting money by playing a band in front of the houses of defaulters.
Jalgaon Municipality News : 'अमृत'च्या नावाने नवीन रस्त्यांचा सत्यानाश सुरूच!

त्यामुळे नागरिकांनी वेळेत कर भरावा, असे आवाहन पालिकेने केले आहे. पालिकेने शहरात विभागनिहाय वसुली पथके नेमली आहेत. कर्मचाऱ्यांनी मालमत्ता कर, पाणीपट्टी व गाळे भाडेपट्टीच्या पावत्यांचे वाटप केले आहे.

वारंवार मागणी करून थकबाकी न देणाऱ्या करदात्यांच्या घरापुढे वसुली कर्मचाऱ्यांनी बँड वाजवून गांधीगिरी सुरू केली आहे. गेल्या महिन्यात थकबाकी न भरणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा मुख्याधिकारी देशमुख यांनी दिला होता. मात्र, वसुली कर्मचाऱ्यांना नागरिक दाद देत नाहीत, म्हणून थकबाकीदाराच्या घरासमोर बँड वाजविणे सुरू केले आहे.

थकबाकी भरली नाही, तर शहरात मध्यवर्ती ठिकाणी नाव प्रकाशित करणे, नळ जोडणी बंद करणे, मालमत्ता जप्त करणे अथवा सील करणे, अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे. वसुली मोहीम पथकात उपमुख्याधिकारी रोहित पगार, करवसुली अधीक्षक आदित्य मुरकुटे, स्वच्छता निरीक्षक सागर झावरे, वसुली लिपिक राधेश्‍याम निकम, शशिकांत मोरे, चेतन लोंढे, रमेश जावळे यांचा समावेश आहे.

Municipal employees collecting money by playing a band in front of the houses of defaulters.
Nashik News : महामार्ग प्राधिकरणाचे वीजबिल थकले! सुविधांच्या अभावामुळे वाहनधारकांच्या जीव टांगणीला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()