Nashik Unseasonal Rain : कांदा शेड, विजेचे पोल जमीनदोस्त; येवल्यात वळिवाच्या पावसाचा तडाखा

Nashik News : बुधवारी (ता.१५) सायंकाळी शहरात तासभर विजांच्या कडकडाटासह झालेल्या वळिवाच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले.
Onion traders shed destroyed by storm and Damage caused by falling tree on tractor.
Onion traders shed destroyed by storm and Damage caused by falling tree on tractor.esakal
Updated on

येवला : बुधवारी (ता.१५) सायंकाळी शहरात तासभर विजांच्या कडकडाटासह झालेल्या वळिवाच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले. येथील कांदा व्यापाऱ्याचे शेड जमीन दोस्त होऊन सुमारे ६०० क्विंटल कांद्याचे नुकसान झाले तर ठिकठिकाणी झाडे पडले. वादळी वाऱ्यामुळे विजेचे पोलही जमीनदोस्त झाले असून ताराही तुटल्या. (Yeola suffered heavy damage due to rain)

येवला शहर व तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या वळिवाच्या पावसामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बुधवारी सायंकाळी सहाला अचानक आलेल्या वादळी पावसामुळे बाभूळगाव परिसरातील कांदा व्यापारी लक्ष्मण सोनवणे व श्री. अन्सारी यांच्या मालकीचे कांदा शेड कोसळून लाखोंचे नुकसान झाले. यात सुमारे ५०० ते ६०० क्विंटल कांदा ओला झाला.

शहरात तासाभराच्या या वादळात अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटल्या. शनी पटांगणात वीजेचा पोल फरसाणच्या दुकानावर पडून मोठे नुकसान झाले. ठिकठिकाणी तारा देखील तुटल्याने रात्री उशिरापर्यंत शहर परिसरातील वीज पुरवठा खंडित होता. वादळीवाऱ्यासह दहा ते पंधरा मिनिटे पावसाचे आगमन झाल्याने सर्वत्र पाणी पाणी झाले. वळिवाच्या या पावसाने उकाड्यापासून येवलेकरांना काहीसा दिलासा मिळाला.

तालुक्यातही नुकसान

येवला तालुक्यात वादळी पावसामुळे ठिकठिकाणी दोन दिवसात मोठे नुकसान झाले आहे. चिचोंडी-साताळी परिसरात घराचे छत पडून लहान मुलगा जखमी झाला आहे. अवकाळी पावसामुळे व जोरदार वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी झाडे पडले असून अनेक ठिकाणी विजेचे पोल देखील उघडून पडले आहेत. (latest marathi news)

Onion traders shed destroyed by storm and Damage caused by falling tree on tractor.
Nashik News : पावसाची विश्रांती, तापमानात वाढ! कमाल तापमान पुन्‍हा 40 अंशांच्‍या उंबरठ्यावर

सर्वाधिक नुकसान चिचोंडी व साताळी परिसरात झाले असून या ठिकाणी बापू राजगुरू यांच्या घरासमोर लावलेल्या ट्रॅक्टरवर झाड पडून ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले तसेच दादाभाऊ सोनवणे यांच्या घरावर झाड कोसळून त्यांचा लहान मुलगा आकाश सोनवणे हा गंभीर जखमी झाला असून घराचेही नुकसान झाले आहे.

तसेच विशाल काळे यांचा जनावरांचा गोठा उद्ध्वस्त झाला. फरताळवाडी परिसरत बुधवारी वादळी पाऊस, गारपीट झाली. जोरदार वादळामुळे विठ्ठल बोरसे यांच्या घराचे पत्रे अर्धा किलोमीटर पर्यंत उडून गेले. विद्यासागर मोरे यांच्या गोठयात छप्पर दोन गायींच्या अंगावर कोसळल्या मुळे एक गाय जखमी झाली. विजय बोरसे यांच्या गोठयाचे पत्रे व चारा वळई उडाल्याने नुकसान झाले. राजेंद्र बोरसे व बाळू चव्हाण यांच्याही गोठ्याचे पत्रे उडून गेले.

Onion traders shed destroyed by storm and Damage caused by falling tree on tractor.
Nashik Onion News : जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला ‘कांदा’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.