Nashik News : बिहार योग विद्यालयामार्फत 5 जुलैपासून योग साधना सत्र!

Nashik News : योग म्हणजे केवळ विविध आसने नसून, ती एक जीवनशैली आहे. शरीर, मन आणि अध्यात्म यांचा तो त्रिवेणी संगमच आहे.
Yoga Sadhana session from 5th July through Bihar Yoga Vidyalaya
Yoga Sadhana session from 5th July through Bihar Yoga Vidyalayaesakal

Nashik News : बिहार योग विद्यालय विश्व योग पीठ, मुंगेर यांच्या प्रेरणेने योगसाधना सत्राचे नाशिकमध्ये ५ ते ७ जुलै या कालावधीत श्रद्धा लॉन्‍स येथे सकाळी आणि सायंकाळी साडेसहा ते साडे आठ या वेळेत हे योगसत्र पार पडणार असून, सहभागी शिबिरार्थींना स्वामी शिवराजानंद सरस्वती मार्गदर्शन करणार आहेत. (Yoga Sadhana session from 5th July through Bihar Yoga Vidyalaya)

योग म्हणजे केवळ विविध आसने नसून, ती एक जीवनशैली आहे. शरीर, मन आणि अध्यात्म यांचा तो त्रिवेणी संगमच आहे. या उद्दीष्टाने बिहार योग विद्यालयाचे कार्य गेल्या सहा दशकांपासून देश-विदेशात अखंडपणे सुरु आहे. स्वामी शिवानंद सरस्वती ब्रिटीश मलायात वैद्यकिय सेवा देत होते.

भारतात येऊन ऋषीकेशला त्यांनी डिव्हाईन लाईफ सोसायटीची स्थापना केली होती. त्यांच्या प्रमुख शिष्यांपैकी स्वामी सत्यानंद सरस्वती एक होते. स्वामी सत्यानंद सरस्वती यांनी बिहार योग विद्यालयाची स्थापना केली. व हे आज विश्वाचे योग केंद्र बनले आहे. (latest marathi news)

Yoga Sadhana session from 5th July through Bihar Yoga Vidyalaya
International Yoga Day 2024 : आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जूनलाच का साजरा केला जातो? काय आहे यंदाची थीम? घ्या जाणून

योगावरील गीता समजल्या जाणाऱ्या व १९६९ मध्ये त्यांनी स्वानुभवाने लिहिलेल्या 'आसन, प्राणायम, मुद्रा, बंध' या जागतिक लोकप्रिय ग्रंथाचे ते लेखक आहेत. २००९ मध्ये त्यांनी संजीवन समाधी घेतली. त्यांचे शिष्य स्वामी निरंजनानंद सरस्वती यांनी जन्मतःच आपल्या गुरुंच्या योगनिद्रा तंत्राद्वारे सर्व लौकिक व अध्यात्मिक ज्ञान ग्रहण केले.

मखमलाबाद-लिंक रोडवरील श्रद्धा लॉन्स येथे गोदा श्रद्धा फाउंडेशनच्या सौजन्याने आणि सुरेश अण्णा पाटील यांचे सहकार्याने हे शिबिर होत आहे. नागरिकांसाठी हे शिबिर मोफत असून, अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्‍हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Yoga Sadhana session from 5th July through Bihar Yoga Vidyalaya
International Yoga Day 2024 : महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर आहेत ‘ही’ योगासने, दररोज सराव केल्याने मिळतील भरपूर फायदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com