Yoga Week : योग सप्ताहाला विविध उपक्रमांनी सुरवात; 21 जूनपर्यंत विविध ठिकाणी कार्यक्रमांतून मार्गदर्शन

Nashik News : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्‍या पार्श्वभूमीवर योग, प्राणायाम, ध्यानधारणा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
Yoga practice conducted by the practitioners participating in the program organized on the occasion of Yoga Week.
Yoga practice conducted by the practitioners participating in the program organized on the occasion of Yoga Week.esakal
Updated on

Nashik News : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्‍या पार्श्वभूमीवर योग, प्राणायाम, ध्यानधारणा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सुयश हॉस्‍पिटल, संगू गुरुजी चॅरिटेबल ट्रस्‍ट, एम्‍पायर स्‍पायसेस ॲण्ड फूड्‌स लिमिटेड, व भारत विकास परिषद, नाशिक मिडटाऊन पुरस्‍कृत, यांच्‍यातर्फे हा अभिनव उपक्रम आयोजित केला आहे. 'सकाळ' उपक्रमासाठी माध्यम प्रायोजक आहेत. (Yoga week begins with various activities Guidance through programs)

सप्ताहाला शनिवारी (ता. १५) अंबड परिसरात आयोजित कार्यक्रमाने सुरवात झाली. आठवडाभर आयोजित कार्यक्रमांतून समाजाच्‍या विविध स्‍तरांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. योग सप्ताहाच्‍या पहिल्‍या दिवशी शनिवारी (ता. १५) सकाळी साडेसात ते नऊ दरम्यान अंबड येथील इंडो पंप एन.डी. ठाकरे यांच्या कंपनीमध्ये योगासाधना करण्यात आली.

येत्‍या २१ जूनपर्यंत चालणाऱ्या या सप्ताहात सर्वसामान्‍य नागरिक, वेगवेगळे समूह, औद्योगिक संस्‍था, कॉर्पोरेट कार्यालये, शासकीय कर्मचारी, ज्‍येष्ठ नागरिक, व महिला आदी विविध घटकांसाठी दीड तासांच्‍या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये ओंकार, योगसाधना, प्राणायाम, आणि ध्यानधारणा आदींबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले जाणार आहे.

सोबत निरामय आरोग्‍यासाठी योग, प्राणायाम, ध्यानसाधना, व आरोग्‍य यांच्‍या सकारात्‍मक संबंधांबाबत उपयुक्‍त माहिती दिली जाणार आहे. या सप्ताहासाठी माध्यम प्रायोजक 'सकाळ' असून, रेडिओ पार्टनर रेडिओ विश्‍वास हे आहेत. (latest marathi news)

Yoga practice conducted by the practitioners participating in the program organized on the occasion of Yoga Week.
Yoga For Reduce Hair Fall: 'हे' योग केस गळण्याची समस्या करतील दूर, केस होतील काळे अन् घनदाट

कार्यक्रमातून मार्गदर्शन

कार्यक्रमास उपस्‍थितांना योगसाधना कशी केली जाते, याचे प्रात्यक्षिक दाखविले. योगसाधनाचे जीवनामध्ये असलेले महत्त्व, योग म्हणजे नेमके काय आहे, योग म्हणजे नुसते योगासन नसून योग म्हणजे शरीर व मनाचे एकत्रीकरण व मनाचे व आत्मशक्तीचे एकत्रीकरण व आत्मशक्ती व परमात्मा शक्तीचे मिलन म्हणजेच योग पतंजली ऋषीने वर्णन केलेले अष्टांग योगाचे माहिती संगु गुरूजी यांनी दिली. सप्ताहातील विविध कार्यक्रमांमध्ये अशा प्रकारे मार्गदर्शन केले जाणार आहे.

असे आहे सप्ताहाचे नियोजन

रविवारी (ता.१६) सुयश हॉस्‍पिटल येथील कार्यक्रमात शहरातील विविध ज्‍येष्ठ नागरिक संघ उपस्‍थित राहातील. सोमवारी (ता.१७) औद्योगिक कामगार वसाहतीतील सॅमसोनाईट साऊथ एशिया प्रा. लि. प्रकल्‍पात कार्यक्रम होणार असून, अधिकारी व कर्मचारी उपस्‍थित राहातील. मंगळवारी (ता.१८) पोलिस आयुक्‍तालयातील कार्यक्रमात पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले जाईल.

Yoga practice conducted by the practitioners participating in the program organized on the occasion of Yoga Week.
International Yoga Day 2024: योगासनांचा सराव करण्यापुर्वी अन् नंतर टाळा 'या' चुका

बुधवारी (ता.१९) त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलिस अकादमी येथील प्रशिक्षणार्थी, कर्मचारी, अधिकारी वर्ग यांच्‍यासाठी कार्यक्रम आयोजित केला आहे. तर गुरुवारी (ता.२०) रविवार कारंजा येथील जैन स्‍थानकात होणाऱ्या कार्यक्रमास जैन समाज, जैन श्रावक संघ, जैन संघटना, जैन युवक मंडळ यांचे सदस्‍य उपस्‍थित राहातील.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्‍या दिवशी २१ जूनला पंचवटीतील मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथे होणाऱ्या कार्यक्रमास जिल्‍हाधिकारी कार्यालय, जिल्‍हा प्रशासन, जिल्‍हा परिषद, एम्‍पायर स्‍पायसेस ॲण्ड फुड्‌स लि., सुयश हॉस्‍पिटल, भारत विकास परिषद मिडटाऊन, ‘सकाळ’चे अधिकारी, कर्मचारी तसेच रेडिओ विश्‍वास, विश्‍वास सहकारी बँक व इतर विविध साधकवर्ग सहभागी होणार आहेत.

Yoga practice conducted by the practitioners participating in the program organized on the occasion of Yoga Week.
Yoga Tips: 'या' योगासनांचा सराव केल्यास वडिल राहतील निरोगी अन् तंदुरूस्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.