Nashik News : परिसरातील पिंजारघाट येथील वाड्याची भिंत कोसळून एक जण जखमी झाला आहे. जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. रविवार (ता.४) सायंकाळच्या सुमारास घटना ही घडली. ओवेस रशीद शेख (वय २२) असे जखमी तरुणाचे नाव आहे. मुबीन पीरजादा यांचा वाडा पिंजार घाट येथे असून वाड्याचा एक भाग काही वर्षांपूर्वी एका बेकरी चालकास भाडेतत्त्वावर देण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षांपासून बेकरी बंद असल्याने अतिशय दुरवस्था झाली होती. (Young people were injured due to collapse of palace wall in old nashik )
थोडा-थोडा भाग कोसळण्याचे प्रकार घडत होते. याबाबत मुबीन पीरजादा यांनी वाड्याचा धोकादायक भाग उतरून घेण्यासंदर्भात महापालिकेस अर्जही केला होता. मात्र मालक-भाडेकरू यांचा वाद न्यायालयीन प्रविष्ट असल्याने महापालिकेकडून वाडा उतरवण्यास असहमती दर्शवल्याची माहिती देण्यात आली. रविवार (ता. ४) झालेल्या जोरदार पावसाने सायंकाळच्या सुमारास बेकरीची धोकादायक भिंत कोसळून संपूर्ण बेकरीचा भाग जमिनीवर कोसळला. (latest marathi news)
रस्त्याने जाणारा तरुण ओवेस शेख याच्या अंगावर भिंतीचा काही भाग पडल्याने त्याच्या डोक्यास मार लागून गंभीर जखमी झाला आहे. त्यास उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून बेकरी बंद असल्याने कुठल्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. बेकरीचा भाग कोसळल्याने मात्र परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली.
महापालिकेकडून धोकादायक बाब म्हणून बेकरीचा धोकादायक भाग आधीच उतरवून घेतला असता तर असा प्रकार घडला नसता, अशी चर्चा परिसरात सुरू होती. सुदैवाने कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडली नसल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. अनेक वाड्यांच्या बाबतीत अशाच प्रकारे मालक आणि भाडेकरू वाद सुरू असल्याने अशा घटनांना निमंत्रण मिळत असल्याचे बोलले जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.