Inspirational News : बाळाचे संगोपन करून जिद्दीने ‘फिटनेस’चा सराव! खाकी वर्दीसाठी घाम गाळणाऱ्या युवती ठरतायेत प्रेरणास्रोत

Nashik News : गामणे मैदानावर दररोज सायंकाळी सुमारे दोन तास घाम गाळणाऱ्या १५ ते १६ युवती येथे व्यायामासाठी येणाऱ्या शेकडो नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
Young woman sweating on the playing field for police recruitment .
Young woman sweating on the playing field for police recruitment .esakal
Updated on

Nashik News : प्रभाग ३१ मधील वासननगर येथील साडेसात एकरावर असलेल्या गामणे मैदानावर दररोज सायंकाळी सुमारे दोन तास घाम गाळणाऱ्या १५ ते १६ युवती येथे व्यायामासाठी येणाऱ्या शेकडो नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. (Inspirational News)

कोणी पदवीपर्यंत, तर कोणी पदव्युत्तर शिक्षण घेऊन अंगावर खाकी वर्दी यावी आणि संरक्षण खात्यात भरती होण्याच्या जिद्दीने त्या कसून शारीरिक चाचणीची तयारी करत आहेत. विशेष म्हणजे या मैदानावर वैयक्तिक सरावासाठी येणाऱ्या दोघी तिघी, तर विवाहित असून लहान बाळाचे संगोपन करून जिद्दीने शारीरिक फिटनेसचा सराव करत आहेत.

या मोठ्या ग्रुपमधील युवती एकमेकाला मार्गदर्शन करत आणि एक दुसरीचा सराव करून घेत यशाला गवसणी घालण्याच्या प्रयत्नात आहेत. खासगी मार्गदर्शकांच्या आधुनिक तंत्रानुसार त्यांचा हा सराव सुरू आहे. सुरवातीला धावणे, त्याच्यानंतर स्ट्रेचिंग आदी प्रकारच्या व्यायामासोबत शारीरिक चाचणीसाठी आवश्यक गोळाफेक आणि लांबउडी आदी आवश्यक क्रीडा प्रकारांच्या तंत्रांचा त्या सराव करतात.

आठवड्यातून एक वेळा त्या लांब पल्ल्याच्या धावण्याच्या सरावासाठी मैदानाबाहेर जातात. प्रत्येकीच्या घरातील परिस्थिती वेगळी आहे. कोणी सधन घरातील आहेत, तर कोणाच्या घरची परिस्थिती साधारण आहे. मात्र जिद्दीने खाकी वर्दी मिळवायची हा एक समान धागा या सर्वांमध्ये आहे. शिवानी बोंबलवाड, सोनाली देवरे, सृष्टी डोंगरे, आकांक्षा दवंडे, पौर्णिमा खिल्लारे, अंजली बोराडे, ऋतुजा उगले, कांचन वाघ, तेजल नागरे, प्रतिमा तुपे, प्रांजल निकुंभ. (latest marathi news)

Young woman sweating on the playing field for police recruitment .
Nashik News : अध्यक्षपद 19, सरचिटणीसपदासाठी 22 इच्‍छुक; आज नामनिर्देशन छाननी

मनीषा डुकळे, दीपा लांडे, नेहा पाटील, पूनम, कावेरी आदींचा यात समावेश आहे. निखिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या सराव करतात. शारीरिक कसरतीसोबतच लेखी परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या अभ्यासाचीदेखील त्या तयारी करत आहेत. हा सर्व सराव करत असताना काही घर कामात आईला बरोबरीने मदत करतात.

सर्वांच्याच पालकांचा भक्कम पाठिंबा त्यांना आहे. स्वतःच्या पायावर उभे राहाणे. आयुष्यभरासाठी उपयोगात येणारी सुदृढ शरीराची देणगी मिळवणे आणि कुटुंबीयांना अभिमान वाटेल अशा खात्यात नोकरी मिळवण्याच्या या युवतींच्या जिद्दीचे व्यायामासाठी येणारे नागरिक आणि महिलादेखील कौतुक करतात.

"शारीरिक पात्रता सिद्ध केल्यानंतर लेखी परीक्षेला सामोरे जावे लागते. त्यामुळे कसून सराव सुरू आहे. प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. कष्टाला नक्की फळ मिळेल, असा विश्वास आहे. सर्वजणी एकमेकाला सांभाळून आणि मार्गदर्शन करत खाकी वर्दी अंगावर यावी यासाठी जीव तोड मेहनत घेत आहोत. स्वतःच्या पायावर उभे राहायचे आणि कुटुंबीयांचे स्वप्न पूर्ण करण्याचा जीवतोड प्रयत्न करत आहोत." - सोनाली देवरे

"दररोज या मुलींची मेहनत बघतो. इतरांसाठी त्या प्रेरणा स्रोत ठरल्या आहेत. या मैदानात भरपूर जागा आहे. एका स्वतंत्र जागेत या मुलींना नियमित सरावासाठी गोळा फेक आणि अत्याधुनिक लांबउडीचे मैदान विकसित होणे गरजेचे आहे." - भिला गायकवाड, ज्येष्ठ नागरिक

Young woman sweating on the playing field for police recruitment .
Nashik District Bank : जिल्हा बँकेचे 73 सेवानिवृत्त कर्मचारी पीएफपासून वंचित!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com