वणी : दिंडोरी तालुक्यात बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी शिवारात एका सतरा वर्षीय युवक बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. वनारवाडी येथील सतरा वर्षीय युवक विठ्ठल भीमा पोतदार हा गाई चारण्यासाठी वनारवाडी शिवारातील खंडेराव डोंगराच्या कपारीकडे गेलेला होता. संध्याकाळी सहाच्या सुमारास घराकडे परततांना विठ्ठल पोतदार त्याच्यावर अचानक हल्ला केला. (Nashik youth died in leopard attack in Vanarwadi)