नाशिक : रशिया फेडरेशनद्वारे 1 मार्च ते 7 मार्चदरम्यान रशियातील सोची येथे जगातील सर्वांत मोठ्या जागतिक युवा महोत्सवात नाशिक जिल्ह्यातील युवक प्रतिनिधी सहभागी झाले होते. जगभरातील १८८ देशांतील १० हजारांहून अधिक रशियन आणि परदेशी युवा संशोधकांसह माध्यम, व्यापार, आंतरराष्ट्रीय सहकार्य, संस्कृती, विज्ञान, शिक्षण आणि क्रीडा यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर या जागतिक युवा महोत्सवात सहभागी झाले होते. (nashik World Youth Festival marathi news)
भारतातर्फे सहभागी झालेल्या ३६० जणांच्या शिष्टमंडळामध्ये नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील श्री.विनीत मालपुरे यांना भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. जागतिक युवा महोत्सवात जागतिक अर्थव्यवस्था, हवामान बदल, सांस्कृतिक बदल, डिप्लोमसी आणि युवा मंच अशा विविध विषयांवर विविध मान्यवरांचे व्याख्यान, परिषदा, कार्यशाळा आणि क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते. (latest marathi news)
भारतीय शिष्टमंडळातील राष्ट्रीय युवा पुरस्कारथी विनीत मालपुरे यांनी डेनिस पुशिलिन यांच्या सोबत संवाद साधला. डेनिस पुशिलिन हे युक्रेनच्या डोनबास प्रदेशातील एक राजकारणी आहेत, जे 2018 पासून डोनेस्तक पीपल्स रिपब्लिक (DPR) चे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. तसेच ओलेग मॅटित्सिन हे रशियाचे क्रीडा मंत्री आहेत 2015 पासून आंतरराष्ट्रीय विद्यापीठ क्रीडा महासंघाचे (FISU) अध्यक्ष आहेत. यांच्या समवेत देखील श्री विनीत मालपुरे यांनी संवाद साधला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.