नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील काठेगल्ली सिग्नल येथे भरधाव वेगातील परिवहन महामंडळाच्या बसने ट्रीपलसीट मोपेडला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये पाठीमागे बसलेला २३ वर्षीय युवक ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल ज्ञानेश्वर उर्फ नाना बेंडकुळे (२३, रा शिवाजीवाडी, वडाळा-पाथर्डी रोड) असे अपघातात मयत युवकाचे नाव आहे. (Youth on moped died in collision with bus Incident at Kathe Galli signal )
मुंबई नाक्याचे अंमलदार शरद अर्जून देवरे यांच्या फिर्यादीनुसार, मोपेडचालक आकाश अरुण वार्डे, राम नाना वाघ व राहुल बेंडकुळे हे तिघे मोपेडवरून (एमएच १५ जेजी २१६३) बनकर चौकाकडून नागजी चौकाकडे येत होते. त्याचवेळी नाशिकरोडकडून भरधाव वेगात परिवहन महामंडळाची बस (एमएच ०४ एलक्यु ९४५८) येत होती. काठेगल्ली सिग्नल येथे मोपेड वाहन रस्ता ओलांडत असतानाच, भरधाव वेगातील बसने मोपेडला पाठीमागून धडक दिली.
या अपघातामध्ये आकाश व राम यांना किरकोळ दुखापत झाली. तर पाठीमागे बसलेला राहुल मात्र गंभीररित्या जखमी झाला. त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, वैदयकीय अधिकार्यांनी तपासून मयत घोषित केले. तर याप्रकरणी बसचालक शरद अर्जून देवरे (रा. नागापूर रोड, ता. नांदगाव) यांच्याविरोधात मुंबई नाका पोलिसात मृत्युस कारणीभूत ठरल्यासह अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक वाघ हे तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.