Nashik News: अशी झाली ‘त्या’ दोघा तरुणांची सुटका! जगताप अन बागूल कुटुंबात आनंदोत्सव

Nashik News : तारुखेडले व खानगाव थडी (ता. निफाड) येथील दीड ते दोन महिन्यांपासून कुवेतजेलमध्ये अडकलेल्या तरुणांची सुटका एका ट्विटमुळे झाली.
Working President of All India Seafarers Union Abhijit Sangle and other office bearers welcoming Avishkar Jagatpa and Nivritti Bagul at the airport.
Working President of All India Seafarers Union Abhijit Sangle and other office bearers welcoming Avishkar Jagatpa and Nivritti Bagul at the airport.esakal
Updated on

निफाड/चांदोरी : तारुखेडले व खानगाव थडी (ता. निफाड) येथील दीड ते दोन महिन्यांपासून कुवेत जेलमध्ये अडकलेल्या तरुणांची सुटका एका ट्विटमुळे झाली. स्वत:साठी चांगल्या भविष्याची स्वप्ने पाहत दोन तरुण एका भारतीय एजंटमार्फत २०२३ मध्ये मर्चंट नेव्ही जहाजांमध्ये सामील होण्यासाठी इराणला गेले होते.

तथापि, समुद्रात प्रवास करीत असताना, इराणी मालवाहू जहाज ‘बहारेह’ ११ जानेवारीला कुवेतच्या किनाऱ्यावर बुडाले. ते बुडाले, तेव्हा अविष्कार जगताप (वय २०), निवृत्ती बागूल (वय २५) आणि पाच इराणीसह सात नावीक जहाजावर होते. अविष्कार आणि निवृत्ती हेच बचावले आणि बोटीतून जीव वाचविण्यात यशस्वी झाले. कुवेत अधिकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात नेले. वैद्यकीय तपासणीनंतर तेथील पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. (nashik youths Tarukhedle Khangaon Thadi stuck in Kuwait jail for one half 2 months released because tweet marathi news)

या दुर्घटनेत जीव वाचला, पण त्यांचे पासपोर्ट आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे हरविली. त्यांच्याकडे संबंधित कागदपत्रे नसल्याने अधिकाऱ्यांनी त्यांना कुवेतमधील तुरुंगात ठेवले, असे अविष्कारच्या चुलत भाऊ अविनाश यांनी सांगितले.

दोघेही गरीब शेतकरी कुटुंबातील आहेत. अविनाश यांनी सांगितले, की आम्ही मदतीसाठी ऑल इंडिया सिफेरर्स ॲन्ड जनरल वर्कर्स युनियनशी संपर्क साधला. युनियनचे कार्याध्यक्ष अभिजित सांगळे मुळचे वसई येथील असल्याने त्यांनी त्यांच्या तत्काळ शोध घेण्यास सुरवात केली.

सध्या बागूल आणि जगताप कुठल्या जेलमध्ये आहेत. त्यांच्यावर कुठल्या स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे का, याबाबत माहिती घेत त्यांनी त्यांच्या सुटकेसाठी अधिकाऱ्यांकडे गेले. तेथे आवश्यक पत्रव्यवहार केले. जगताप आणि बागूल यांना तत्काळ मायदेशी परतण्यासाठी भारतीय मिशनच्या हस्तक्षेपाची विनंती केली.

या विषयावरील तुमचा जलद प्रतिसाद अत्यंत कौतुकास्पद असेल, अशा आशयाचा मेल ऑल इंडिया सिफेरर्स ॲन्ड जनरल वर्कर्स युनियनचे अध्यक्ष संजय पवार यांनी परराष्ट्रमंत्री डॉ. जय शंकर यांना केला. यावर आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी कुवेतमधील भारतीय दूतावासाला सूचना पाठवल्या आणि कुवेतमधील भारतीय दूतावासाने सकारात्मक प्रतिसाद देत बागूल आणि जगताप यांना पासपोर्ट आणि आवश्यक त्या सुविधा पुरवल्या आणि त्यांना मायदेशी परत पाठवले. (Latest Marathi News)

Working President of All India Seafarers Union Abhijit Sangle and other office bearers welcoming Avishkar Jagatpa and Nivritti Bagul at the airport.
World Obesity Day 2024: आहार-विहारामुळे टाळता येऊ शकते स्थूलता! महिलांमध्ये PCOD समस्येत होतेय वाढ

यांची झाली मदत

आमदार सुहास कांदे, अभिजित सांगळे, संजय पवार, भारत शिकारे, गजूमामा माणकर, रामभाऊ आंधळे, संजय जगताप, अविनाश जगताप.

ट्विटच्या माध्यमातून माहिती

इराणचे निरीक्षक झानी यांनी केलेले ट्विट ऑल इंडिया सिफेरर्स युनियनचे कार्याध्यक्ष अभिजित सांगळे यांनी बघितले. तत्काळ झानी यांना फोनवर संपर्क करून अधिक माहिती घेतली, तसेच कुवेत दूतावासासोबत मेलद्वारे पत्रव्यवहार सुरू ठेवला.

"महिन्यापासून कुवेतमध्ये अडकलो होतो. ऑल इंडिया सिफेरर्स युनियनच्या पाठपुराव्यामुळे तेथून सुटका झाली व मायदेशी परतलो. आपल्या मातीत आल्याने वेगळाच आनंद मिळाला. अटक झाल्याने पुन्हा आपल्या देशात येण्याच्या आशा मावळल्या होत्या. मात्र, युनियनमुळे पुन्हा भारतात येता आले." -आविष्कार जगताप व निवृत्ती बागूल

Working President of All India Seafarers Union Abhijit Sangle and other office bearers welcoming Avishkar Jagatpa and Nivritti Bagul at the airport.
Wedding Ceremony Business : नव्या ट्रेंडमुळे ग्रामीण भागात लग्नकाऱ्यात ‘इव्हेंट’वर भर! युवकांना मिळाला रोजगार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.