Nashik Crime : ‘नैताळे’तील आधार खासगी हॉस्पिटलविरुद्ध गुन्हा; रुग्ण मृत्यूप्रकरणी जिल्हा परिषद आरोग्य विभागाची कारवाई

Nashik Crime : निफाड तालुक्यातील नैताळे येथील आधार खासगी हॉस्पिटलवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
Crime
Crimeesakal
Updated on

नाशिक : शासकीय परवानगी नसताना गर्भपात शस्त्रक्रिया करून रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी निफाड तालुक्यातील नैताळे येथील आधार खासगी हॉस्पिटलवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकरणी संबंधित हॉस्पिटल व येथील डॉक्टरवर आरोग्य विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील माता व बालमृत्यूचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून दर महिन्याला जिल्हा बालमृत्यू व मातामृत्यू अन्वेषण समितीची बैठक होत असते. (Zilla Parishad Health Department action against Aadhaar Private Hospital in Naitale )

जुलैमध्ये झालेल्या बैठकीत जूनमध्ये नैताळे येथील खासगी हॉस्पिटलमध्ये मातामृत्यू झाल्याचे निर्देशनास आले होते. त्यावर, संबंधित मातामृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. या चौकशीत नैताळे येथे आधार नावाचे खासगी हॉस्पिटलमध्ये आरोग्य विभागाची परवानगी नसताना गर्भपात व शस्त्रक्रिया करून रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे दिसून आले. यानंतर वरिष्ठांच्या सूचनेनुसार तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधीक्षक यांच्या संयुक्त समितीने या प्रकरणी संबंधित हॉस्पिटलविरोधात पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.

Crime
Nashik Crime : वन विभागाच्या हाती लागेना खैर तस्करीतील मुख्य संशयित; 3 महिने उलटूनही प्रकरणाचा तपास रखडलेला

गर्भपात तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असते. मात्र, संबंधित हॉस्पिटलने अशी कोणतीही परवानगी घेतलेली नसल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये असे प्रकार पुन्हा होता कामा नयेत, यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये विनापरवानगी वैद्यकीय उपचार किंवा शस्त्रक्रिया करताना आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे.

Crime
Nashik Crime : उपनगरांमध्ये तीन घरफोड्यात 10 लाखांचा ऐवज चोरीला! शहरात घरफोड्यांचे सत्र; गल्ल्यातून साडेसात लाख चोरीला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.