Nashik News : कोटी खर्चुनही महिलांच्या डोक्यावर हंडाच! हर घर नल योजनेचा बोजवारा

Nashik News : जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा मार्फत ग्रामस्तरावर जलजीवन मिशन राष्ट्रीय पेयजल यांसारख्या योजना राबवल्या मात्र कोट्यवधींचा निधी खर्च होउनही महिलांच्या डोक्यावर हंडा कायमच आहे.
women carry water through Handa
women carry water through Handa esakal
Updated on

Nashik News : हर घर नल का जल हेच ध्येय धोरण ठेऊन शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा मार्फत ग्रामस्तरावर जलजीवन मिशन राष्ट्रीय पेयजल यांसारख्या योजना राबवल्या मात्र कोट्यवधींचा निधी खर्च होउनही महिलांच्या डोक्यावर हंडा कायमच आहे. (water scarcity)

इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रुप ग्रामपंचायत सर्वतीर्थ टाकेद बु येथे २०१८-१९ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत तांत्रिक प्रशासकीय मान्यतेनुसार जवळपास एक कोटी चार लाख ४४ हजार सहाशे चौऱ्यांशी रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली.

प्रशासकीय कामकाजानंतर पहिल्या टप्प्यात उदभव विहीर,दुसऱ्या टप्प्यात ऊर्ध्वनलिका,स्विचरूम,पॅनल बोर्ड,पंपिंग मशिनरी व विद्युत जोडणी,तिसरा टप्पा ९० हजार लिटरचे उंच जलकुंभ,वितरण व्यवस्था,स्टँडपोस्ट करणे बंधनकारक होते.

पाणी लागण्यापूर्वीच दुसरे काम

पहिल्या टप्प्यात उद्बभवास पुरेसे पाणी लागल्यावर वरिष्ठ भूवैज्ञानिक,भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांनी दाखला दिल्यानंतरच दुसरा टप्प्याची कामे हाती घेण्यात यावी व ही कामे पूर्ण झाल्यावरच तिसऱ्या टप्प्यातील कामे पूर्ण करण्यात यावे व तशी अट निविदेत असतांना तसेच जागेवर कामापूर्वी चाचणी कुपनलिका घेऊन पाणी लागल्याची खात्री झाल्यावरच विहिरीचे खोदकाम करावे. (latest marathi news)

women carry water through Handa
Nashik News : 'स्वाभिमानी शेतकरी'चा बारामतीतून एल्गार!

पाण्याचे नमुने जिल्हा प्रयोग शाळेत भौतिक रासायनिक जैविक चाचण्या करून पिण्यायोग्य असल्याचे प्रमाणपत्र घेण्यात यावे. आदी अटी पाळून योजना पूर्ण करणे अपेक्षित असतांनाही महिलांच्या डोक्यावर हंडा कायम आहे.

सध्या योजनेतील विहिरीला पाण्याचा कायमस्वरूपी उदभव नाही. कडवा धरणातील मृत जलसाठ्याचे पाणी विहीरीत सोडले जाते. पाण्याच्या वेळेवर चाचण्या होत नाहीत. चाचणीसाठी कुपनलिका घेतली गेली नाही. नायट्रोजन शेवाळ युक्त दूषित पाण्याचा भर उन्हाळ्यात आठ ते दहा दिवसांनी टाकेद गावाला पाणी पुरवठा होत असल्याचा आसोप आहे. ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या टाकेद,बांबळेवाडी,घोडेवाडी, शिरेवाडी आदी वाड्यांमध्ये अंतर्गत पाईपलाईन व नळ कनेक्शन नाहीत.

ग्रामपंचायतीकडे विचारणा केल्यावर योजना ताब्यात घेतली नसल्याचे सांगितले जाते. एकुणच प्रचंड दुरावस्थेमुळे कोट्यवधीचा खर्च होउनही महिलांच्या डोक्यांवर हंडा कायम असल्याने याविरोधात हंडा मोर्चा काढण्याचा इशारा माजी सरपंच बाळासाहेब घोरपडे, सामाजिक कार्यकर्ते योगेश घोरपडे,सर्पमित्र विजय बांबळे, नीतीन मडके आदींसह ग्रामस्थांनी दिला आहे.

women carry water through Handa
Nashik Water Shortage : जिल्ह्यातील 7 धरणे कोरडीठाक! 31 जुलैपर्यंत पाणी पुरविण्याचे उद्दिष्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.