Nashik ZP News : नवीन इमारतीत कामे अपूर्ण असताना जिल्हा परिषदेची स्थलांतरणाची तयारी

Nashik News : जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील तीन मजल्यांचे बांधकाम पूर्ण झालेली असले, तरी अद्याप त्याची रंगरंगोटी अपूर्ण असून, फर्निचरसाठी निधी नसल्याने काम झालेले नाही.
Zilla Parishad new building
Zilla Parishad new buildingesakal
Updated on

Nashik News : जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील तीन मजल्यांचे बांधकाम पूर्ण झालेली असले, तरी अद्याप त्याची रंगरंगोटी अपूर्ण असून, फर्निचरसाठी निधी नसल्याने काम झालेले नाही. याशिवाय वाढीव तीन मजल्यांचे बांधकामही सुरू आहे. यास्थितीत जिल्हा परिषद प्रशासनाने कार्यालये नवीन इमारतीत स्थलांतरित करण्याची तयारी सुरू केली आहे. (Nashik Zilla Parishad is preparing to relocate while works are incomplete in new building)

आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर हे स्थलांतर केले जाणार असल्याचे सूतोवाच मिळत आहे. सद्यःस्थितीत जिल्हा परिषदेची इमारत प्रशासकीय कामकाजासाठी अपुरी पडत असल्याने सातपूर रोडवरील एबीबी सर्कल परिसरातील पशुसंवर्धन विभागाच्या जागेत नवीन प्रशासकीय इमारतीचे काम सुरू आहे.

या इमारतीच्या प्रस्तावित सहा मजल्यांपैकी सध्या दोन तळमजले, तीन मजले यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यांचे सध्या रंगकाम सुरू आहे. या इमारतीच्या उर्वरित तीन मजल्यांच्या बांधकामासाठीही ग्रामविकास विभागाने मार्चमध्ये ४१.६७ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. यात तीन मजल्यांना फर्निचरसाठी निधी मिळाला नाही.

मात्र, असे असतानाही काम पूर्ण झालेल्या तीन मजल्यांवर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीमधील काही कार्यालये हलविण्याबाबत प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नुकतीच सर्व विभागप्रमुखांसह नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी करत आढावा घेतला. (latest marathi news)

Zilla Parishad new building
Nashik News : मोदींकडे देशाच्या विकासाची पुढच्या 25 वर्षांची ‘ब्ल्यू प्रिंट’ : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

तयार झालेल्या तीन मजल्यांवर जुन्या इमारतीतील शक्य तितकी कार्यालये स्थलांतर करून कार्यालये सुरू करण्याचा प्रयत्न आहे. उर्वरित तीन मजल्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर उर्वरित कार्यालये तेथे स्थलांरित करायची, असे प्रशासनाचे नियोजन आहे. मात्र वास्तविक, सध्या या नवीन इमारतीची रंगरंगोटी बाकी असून, तेथे फर्निचरही झालेले नाही.

फर्निचरशिवाय तेथे नवीन कार्यालये कसे सुरू होणार, वरच्या तीन मजल्यांचे काम सुरू असताना नागरिकांना तसेच कर्मचाऱ्यांना या नवीन इमारतीत ये-जा करण्यात अडथळे येण्याची शक्यता आहे.

सध्याच्या तीन मजल्यांची जागा सर्व कार्यालयांसाठी अपुरी पडणार असल्याने काही कार्यालये जुन्याच इमारतीत ठेवावी लागणार आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात विस्कळितपणा येण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे मुख्यालय नवीन जागेत हलविण्याची घाई का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Zilla Parishad new building
Nashik City Transport : गायकवाड सभागृह परिसरात वाहतूक बंदी! उद्यापासून अंमलबजावणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.