Nashik ZP News : जि.प. शिक्षणाधिकारी पहिल्या घंटीला शाळेवर; अचानक शाळांना भेटी देऊन केली पाहणी

Nashik ZP : जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांनी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना अचानक भेटी दिल्या.
Education Officer Dr. while inspecting the school in a surprise visit to the Zilla Parishad in the district. Nitin Bachhav. Neighboring officers and teachers.
Education Officer Dr. while inspecting the school in a surprise visit to the Zilla Parishad in the district. Nitin Bachhav. Neighboring officers and teachers.esakal
Updated on

Nashik ZP News : जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांनी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना अचानक भेटी दिल्या. डॉ. बच्छाव यांनी बुधवारी (ता. १०) सकाळी साडेसातला बागलाण तालुक्यातील पी.एम.श्री.शाळा अतंर्गत लखमापूर क्रमांक १ शाळेस भेट दिली. भेटीत त्यांनी प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांच्या ॲक्टिव्हिटी तसेच शैक्षणिक गुणवत्ता, विविध उपक्रम, तसेच शाळेतील भौतिक सुविधा यांच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. ()

बागलाण तालुक्यातील अजमीर सौंदाणे येथील जिल्हा परिषदेच्या आदर्श प्राथमिक शाळेला शिक्षणाधिकारी डॉ. बच्छाव यांनी भेट देत शाळेची पाहणी केली. शिक्षण विस्तार अधिकारी विजय पगार, केंद्रप्रमुख विलास पवार उपस्थित होते. ‘गुढीपाडवा, पट वाढवा’ उपक्रमांतर्गत पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

शालेय भौतिक परिसर, सुसज्ज प्रयोगशाळा, ई-लर्निंगयुक्त वर्ग, शालेय परसबाग, कॉम्प्युटर लॅब, शालेय पोषण आहार सुविधा, नवीन व वर्गखोल्यांची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले. चौथीच्या विद्यार्थ्यांनी निरोप समारंभनिमित्त शाळेसाठी ‘स्मार्ट टीव्ही’ भेट दिला. शाळेचे व भावी पिढीचे देणे लागतो, या जाणिवेतून विद्यार्थ्यांनी आपल्या नवीन वर्गमित्रांसाठी शाळेला टीव्ही उपलब्ध करून दिला. (latest marathi news)

Education Officer Dr. while inspecting the school in a surprise visit to the Zilla Parishad in the district. Nitin Bachhav. Neighboring officers and teachers.
Nashik ZP News : जिल्ह्यातील 10 हजार 325 जलस्रोतांची तपासणी; जि. प. पाणी व स्वच्छता विभागाची मोहीम

‘मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत शाळेचा पहिला क्रमांक आल्याबद्दल बच्छाव यांनी शाळेचे कौतुक केले. यानंतर डॉ. बच्छाव यांनी बागलाण पंचायत समितीत गटशिक्षण अधिकारी, विस्ताराधिकारी, सर्व केंद्रप्रमुख, बीआरटी कर्मचारी, पंचायत समिती शिक्षण कर्मचारी यांची आढावा बैठक घेतली.

बैठकीत, सर्व शाळांनी संयुक्त अनुदानातून उन्हाळी अभ्यासक्रमाच्या प्रिंट काढून सर्व विद्यार्थ्यांना देण्यात याव्यात, शाळा पूर्वतयारी प्रशिक्षण साहित्य गट स्तरावर प्राप्त झाली असून, ते साहित्य प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत वेळेत पोचवावे, ‘गुढीपाडवा, पट वाढवा’ केंद्रांतर्गत झालेल्या कार्यक्रमांचा नियमित आढावा घ्यावा, आदर्श शाळांचे सर्व उपक्रम इतर शाळांपर्यंत पोचवावेत, तालुक्यातील सर्वच शाळा आदर्श आहेत, असे समजून सर्व उपक्रम व्यवस्थितपणे राबवावेत.

ग्रंथालय, भाषा पेटी, गणित पेटी, इंग्रजी पेटी, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, इतर शासनाकडून आलेल्या सर्व साहित्यांचा व्यवस्थित विद्यार्थ्यांचे अध्यापनात वापर करावा तसेच उन्हाळी सुटीतील अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी पूर्ण केला का, याचा आढावा वर्ग शिक्षकांनी पालकांकडून घ्यावा, अशा सूचना त्यांनी या वेळी दिल्या.

Education Officer Dr. while inspecting the school in a surprise visit to the Zilla Parishad in the district. Nitin Bachhav. Neighboring officers and teachers.
Nashik ZP News : जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात ऑनलाइन केसपेपर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.