Nashik ZP News : पाणीपुरवठा योजनांची त्रयस्थ संस्थेतर्फे तपासणी; पूर्ण योजनांची मागविली यादी

Nashik News : ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून एक हजार ४१० कोटींच्या एक हजार २२२ योजनांची कामे सुरू आहेत. या सर्व योजना पूर्ण करण्याची मुदत ३१ मार्च २०२४ पर्यंत होती.
Nashik ZP News
Nashik ZP News esakal
Updated on

Nashik News : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून आतापर्यंत जलजीवन मिशन अंतर्गत एक हजार २२२ पाणीपुरवठा योजनांपैकी सुमारे ६८१ योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण झाल्याचे दाखवत विभागाने राज्य सरकारकडून पाठ थोपटून घेतली खरी. प्रत्यक्षात मात्र त्रयस्थ संस्थेकडून केवळ १७७ योजनांची गुणवत्ता तपासणी झाली आहे. (222 schemes are being worked on by Rural Water Supply Department)

त्यामुळे ५०४ योजनांची अंतिम गुणवत्ता तपासणी का नाही, याची ओरड झाल्यावर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने उपअभियंत्यांकडून पूर्ण झालेल्या योजनांची यादी मागविली आहे. ही यादी त्रयस्थ संस्थेला देत तातडीने त्यांच्याकडून तपासणी करून घेतली जाईल. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून एक हजार ४१० कोटींच्या एक हजार २२२ योजनांची कामे सुरू आहेत. या सर्व योजना पूर्ण करण्याची मुदत ३१ मार्च २०२४ पर्यंत होती.

मात्र, सहा महिन्यांची मुदत वाढवून देण्यात आली आहे. १५ एप्रिलपर्यंत ६१७ योजनांची कामे पूर्ण केली होती व आता १८ मेपर्यंत ६८१ योजनांची कामे भौतिकदृष्ट्या पूर्ण झाल्याचे विभागाने जाहीर केले. या पूर्ण झालेल्या योजनेतून ६२६ योजनांतून नागरिकांना पाणीपुरवठा सुरू झाला असल्याचा दावाही विभागाने केला आहे.

तपासणीसाठी नियुक्त टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स संस्थेकडून १८ मेपर्यंत या तपासणी संस्थेने ३० लाखांवरील रकमेच्या १४७ पाणीपुरवठा योजनांची तपासणी केली असून, ३० लाखांच्या आतील ३० योजनांची दोन टप्प्यांत तपासणी केली आहे. यामुळे त्रयस्थ संस्थेच्या अहवालानुसार जिल्हा परिषदेने मंजूर केलेल्या एक हजार २२२ योजनांपैकी केवळ १७७ योजना पूर्ण झाल्याचे दिसत आहे. यावर, राज्यस्तरावर नाशिक जिल्हा परिषदेचे कौतुक होत आहे. (latest marathi news)

Nashik ZP News
Nashik Lok Sabha Election : प्रत्येक मशिनचा नंबर उमेदवारांच्या मोबाईलवर; लोकसभा निवडणूक मतमोजणी

मात्र, कामांची पूर्तता झालेल्या प्रत्येक गावातील टँकरपुरवठा खरोखरच बंद होऊ शकलेला नसल्याने योजना पूर्तीचे आकडे आणि वास्तव यात फरक दिसत आहे. भौतिकदृष्ट्या योजना पूर्ण होऊनही अंतिम तपासणी त्रयस्थ संस्थेकडून का झाली नाही, याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले. त्याबाबत, ओरडही सुरू झाली.

त्यावर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांनी शाखा अभियंते, उपअभियंते यांची बैठक घेत तालुकानिहाय पूर्ण झालेल्या योजनांची माहिती मागवून घेतली आहे. ज्या योजनांचे काम ६० टक्के वा त्याहून अधिक झाले, त्याची यादी ही त्रयस्थ संस्थेकडे दिली जाणार आहे. या यादीनुसार, संस्थेने तपासणी करावी, असे निर्देश सोनवणे यांनी दिले आहेत.

पाणीपुरवठा योजनांची सद्यस्थिती

सद्यस्थितीत ३० लाखांच्या आतील ३० योजनांची दोनदा गुणवत्ता तपासणी झाली आहे. ३० लाख ते दोन कोटींच्या दरम्यान एक हजार ७५ योजनांपैकी ७४५ योजनांची दोनदा, तर १०९ योजनांची तीनदा तपासणी झाली. दोन कोटींपेक्षा अधिक रकमेच्या ९४ योजनांपैकी ३८ योजनांची तीनदा तपासणी झाली आहे. तर, सहा योजनांची चार वेळा गुणवत्ता तपासणी झाली.

Nashik ZP News
Nashik District Hospital : सिव्हिल, कारागृहातील खाबूगिरी पुन्हा चर्चेत!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.