Nashik ZP News : प्रशासक कारकीर्द प्रसिद्धीसाठी आता जि. प. चे कॉपी टेबल बुक; 5 लाखांचा होणार खर्च

Nashik ZP : जिल्हा परिषदेत प्रशासकीय राज असून नुकतेच प्रशासकांनी दोन वर्षांचा कालावधी पूर्ण केला आहे.
Nashik ZP
Nashik ZP esakal
Updated on

Nashik ZP News : जिल्हा परिषदेत प्रशासकीय राज असून नुकतेच प्रशासकांनी दोन वर्षांचा कालावधी पूर्ण केला आहे. प्रशासनाने गत दोन वर्षात केलेल्या कामांचा लेखा-जोखा कॉपी टेबल बुकच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे. या कॉपी टेबल बुकसाठी जिल्हा परिषदेच्या स्वनिधी (सेस) वर प्रशासनाने ऐन दुष्काळात, डल्ला मारला असून, त्यासाठी तब्बल ५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. ()

प्रशासनाकडून केलेली कामे, वेळोवेळी प्रसिद्ध होत असताना टेबल बुकची नेमकी काय आवश्यकता आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहाची मुदत २० मार्च २०२२ आणि पंचायत समितींची मुदत २२ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आली. कोरोना, पाऊस आणि ओबीसी राजकीय आरक्षणामुळे निवडणुका मुदतीत होऊ शकलेल्या नाहीत.

त्यामुळे मिनी मंत्रालयाचा कारभार मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पंचायत समितींची जबाबदारी संबंधित गटविकास अधिकारी यांच्याकडे देण्यात आली आहे. २१ मार्च २०२२ पासून जिल्हा परिषदेवर प्रशासकीय राजवट सुरू झाली. नियमानुसार सहा महिन्यांच्या आत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होऊन कारभारी सत्तेवर येणे अपेक्षित आहे. मात्र, दोन वर्षे उलटूनही विविध कारणांमुळे निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत.  (latest marathi news)

Nashik ZP
Nashik ZP News : 2 महिन्यांनी जि. प. चे विभागप्रमुख फिल्डवर

यासाठी वेळोवेळी प्रशासकास मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे जिल्हा परिषदेवर असणाऱ्या प्रशासकास गत महिन्यातचं दोन वर्षे पूर्ण झाली. तसेच समितीवर असलेल्या प्रशासकास देखील दोन वर्षेचा कालावधी पूर्ण झाला आहेत. दोन वर्षात प्रशासकांने केलेल्या कामे जिल्ह्यातील सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासनाने कॉपी टेबल बुक तयार करण्याचा निर्णय घेतला.

या बुकमध्ये प्रशासनाने केलेल्या कामे, नावीन्यपूर्ण योजना, घेतलेले महत्त्वाचे निर्णय, प्राप्त झालेले पारितोषिक, केलेली कामगिरी याबाबतची माहिती दिली जाणार आहे. सदर बुक तयार करण्यासाठी ५ लाख रुपयांचा निधी सेस मधून अगदी घाईघाईने उपलब्ध करून देण्यात आला आहे. वास्तविक, प्रशासनाने केलेल्या कामांची वेळोवेळी प्रसिद्ध झालेली आहे. असे असतानाही प्रशासनाकडून स्वतंत्र बुक तयार करण्याची काय गरज, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रशासनाला प्रचार व प्रसिद्धीसाठी निधी असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. परंतु, जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्याचे संकट गंभीर आहे. या परिस्थितीत दुष्काळ हटविण्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता असताना, प्रसिद्धीचा अट्टहास सुरू आहे.

Nashik ZP
Nashik ZP News : जि. प. चा निधी खर्चाचा टक्का घसरला!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.