Nashik ZP News : संभाव्य पूरस्थितीसाठी सज्ज राहावे : आशिमा मित्तल

Nashik ZP : जिल्ह्यात संभाव्य पूरस्थितीमुळे गावनिहाय गर्भवतींची माहिती घेण्यात यावी.
ZP CEO Ashima Mittal, Nashik
ZP CEO Ashima Mittal, Nashik Newsesakal
Updated on

Nashik ZP News : जिल्ह्यात संभाव्य पूरस्थितीमुळे गावनिहाय गर्भवतींची माहिती घेण्यात यावी. गर्भवतींना पूरस्थितीआधीच १५ दिवस स्थलांतरित करावे. १ जूनपासून जिल्हा परिषदेत २४ तास नियंत्रण कक्ष सुरू करावा, नियंत्रण कक्षामध्ये सक्षम कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्या. जिल्ह्यातील संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मॉन्सून पूर्वतयारी व पाणी गुणवत्तासह नियंत्रण समितीची गुरुवारी (ता. ३०) मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात बैठक झाली, त्या वेळी त्या बोलत होत्या. ()

उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ. हर्शल नेहते, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक लोणे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. भारती चव्हाण यांसह भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे अधिकारी, जिल्हा स्तरावरील आरोग्य पर्यवेक्षक, पाणी व स्वच्छता विभागातील तज्ज्ञ आदी उपस्थित होते.

श्रीमती मित्तल म्हणाल्या, की गेल्या वर्षाच्या पावसाळ्यात कोणत्या अडचणी आल्या होत्या, याची माहिती अद्ययावत ठेवावी. रुग्णवाहिकेत किती स्ट्रेचर आहेत, ते सुस्थितीत आहेत का, याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रात असावी. प्राथमिक केंद्राच्या कार्यकक्षेत गावात गर्भवतींच्या संभाव्य प्रसूतीची तारीख अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेतली. (latest marathi news)

ZP CEO Ashima Mittal, Nashik
Nashik ZP News : टँकरच्या पाण्याची शुद्धता तपासण्यात यावी; जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांचे निर्देश

जिल्ह्यात संपर्क तुटणारी गावे, संभाव्य पूरपरिस्थिती निर्माण होणारी गावे आणि त्याच्या कार्यक्षेत्रातील प्रसूतीचा दवाखाना व महिला वसतिगृह येथे भेटी देऊ याचीही यादी तयार करावी. प्राथमिक पाहणी करावी. आवश्यकतेनुसार आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करावेत. साधनसामग्रीचा आढावा घ्यावा, रुग्णवाहिका सुस्थितीत व सुसज्ज असल्याची खात्री करावी.

तलाठी, ग्रामसेवक, पोलिसपाटील तसेच सरपंच व प्रतिष्ठित नागरिकांच्या संपर्क क्रमांकाची यादी अद्ययावत करावी. प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर २४ तास साथरोग व नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येऊन अत्यावश्यक औषधांची साथरोग किट तयार करण्यात यावी, अशा सूचना डॉ. मोरे यांनी दिल्या.

कक्ष २४ तास कार्यान्वित

जिल्हास्तरावर जिल्हा साथरोग आपत्ती व्यवस्थापन कक्ष व कॉल सेंटर २४ तास कार्यन्वित करण्यात आले आहे. साथरोग व्यवस्थापन कशाचा कॉल सेंटरचा दूरध्वनी क्रमांक ०२५३२९४६५७ साथरोग नियंत्रण कक्ष १ जून २०२४ पासून जिल्हा प्रशिक्षण केंद्र जिल्हा रुग्णालयावर आवारात २४ तास कार्यान्वित राहणार असल्याचे सांगण्यात आले.

ZP CEO Ashima Mittal, Nashik
Nashik ZP News : शिक्षकांच्या यंदा केवळ विनंती बदल्या! प्रशासकीय बदल्या न करण्याचा शासनाचा निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.