Nashik ZP News : जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाने बॅंकेची मुख्य शाखा असलेल्या भामानगर येथील शाखेच्या वेळात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
आता ही शाखा सकाळी साडेदहा ते साडेसहा, या वेळात कर्मचारी सभासदांसाठी खुली राहणार आहे. मात्र, शाखेचा वेळ बदलल्याने कर्मचारी सभासदांनी नाराजीचा सूर व्यक्त केला आहे. (Nashik ZP Change in Staff Bank Main Branch Timings tone of displeasure from workforce)
शासकीय कर्मचाऱ्यांची आर्थिक वाहिनी असलेल्या जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बॅंकेचे जिल्हाभरात १३ हजारांहून अधिक कर्मचारी सभासद आहे.
बॅंकेची मुख्य शाखा ही शहरातील भामानगर भागात असून, रविवार कारंजा, कळवण, मालेगाव व येवला येथे शाखा आहेत. शासकीय कर्मचारी सभासद असल्याने, सभासद हितासाठी बॅंकेची वेळ ही सकाळी नऊ ते साडेबारा व सायंकाळी पाच ते साडेआठ, ही आहे.
मात्र, विद्यमान संचालक मंडळाने भामानगर या मुख्य शाखेच्या वेळात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅंकेने कोअर बॅंकिंग सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याने सभासदांना ही सेवा मिळावी, यासाठी ही वेळ बदलली असल्याचे बॅंकेच्या संचालक मंडळाकडून सांगण्यात येत आहे.
केवळ भामानगर शाखेच्या वेळात बदल असून, रविवारसह सर्व शाखांचे वेळा ‘जैसे थे’ असल्याचेही बॅंकेने स्पष्ट केले आहे. परंतु वेळ बदलण्यात आल्याने सभासदांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
दिवसभर बॅंक खुली असली तरी सभासद हे कामकाजात व्यस्त असतात. त्यामुळे या वेळात कर्मचाऱ्यांना बँकेत जाणे शक्य होणार नसून, गैरसोईचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
"कर्मचारी सभासदांसाठी बॅंकेने कोअर बॅंकिंग ही सुविधा सुरू केली आहे. याशिवाय मोबाईल बॅंकिंग सुविधादेखील मिळणार आहे. त्यामुळे सभासदाला आता कोणत्याही शाखेतून कर्ज उपलब्ध होणार आहे. त्यास मुख्य शाखेतच येण्याची गरज नाही. तसेच रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून बॅंकेकडून विविध माहिती मागविली जाते, मात्र त्यावेळात बॅंक बंद असल्याने अडचण येत होती. यासाठी केवळ मुख्य शाखेच्या वेळात हा बदल केला आहे. यात सभासदांची कोणतीही गैरसोय होणार नाही."
- बाळासाहेब ठाकरे-पाटील, अध्यक्ष, जि. प. सरकारी व कर्मचारी बँक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.