Nashik ZP News : मॉन्सूनपूर्व पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची तपासणी करा

Nashik ZP News : मॉन्सूनपूर्व कालावधीत पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवर लक्ष केंद्रीत करीत त्यांची तपासणी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी आशिमा मित्तल यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.
Check drinking water sources before monsoon
Check drinking water sources before monsoonesakal
Updated on

Nashik ZP News : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीने पिण्याचे पाण्याचे जलस्रोत कोरडे झालेले असतात. जूनमध्ये मॉन्सूनचे आगमन झाल्यावर या दूषित पाण्यामुळे साथीचे आजार होण्याची शक्यता असते. त्यासाठी मॉन्सूनपूर्व कालावधीत पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवर लक्ष केंद्रीत करीत त्यांची तपासणी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी आशिमा मित्तल यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. (Check drinking water sources before monsoon)

जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाकडून मॉन्सूनपूर्व तयारी सुरू झाली आहे. याबाबत, विभागाची बैठक घेण्यात आली. यात मॉन्सूनपूर्व उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले. मॉन्सून काळातील धोके व जोखीम लक्षात घेऊन योग्य शास्त्रीय पद्धतीने नियमित शुद्धीकरण प्रक्रिया करून पाणीपुरवठा करण्यात यावा, जलस्रोत व जलवाहिन्यांजवळचा परिसर स्वच्छ ठेवावा.

सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या जलकुंभाची महिन्यातून एकदा आतून स्वच्छता करावी, पाणीपुरवठा यंत्रणांची वेळेवर व सुयोग्य देखभाल करण्यात यावी, गटविकास अधिकाऱ्यांनी दूषित पाणी नमुन्याबाबतचा दरमहा आढावा घेऊन त्याबाबत आवश्यक ती उपाययोजना करण्याबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेस सादर करावा, अतिदुर्गम भागातील ज्या वाडी-वस्त्यांवर नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित नसेल अथवा पाणीटंचाईमुळे पाणीपुरवठा नियमित होत नसलेल्या भागांत पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी पर्यायी उपाययोजना कार्यान्वित करावी.

पाणी शद्धीकरणासाठी सर्व स्तरांवर योग्य दर्जाच्या ब्लिचिंग पावडरचा, सोडियम हायपोक्लोराईट द्रावण, तुरटी यांचा पुरेसा साठा ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करण्यात यावा, आरोग्य विभागामार्फत क्लोरिन द्रावणाचा साठा प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच ग्रामपातळीवर आशा स्वयंसेविकेमार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रात घरोघरी उपलब्ध करून दिला जावा, ज्याठिकाणी साथीच्या रोगांचा उद्रेक झाला असेल अथवा होण्याची शक्यता असेल. (latest marathi news)

Check drinking water sources before monsoon
Nashik ZP News : बेकायदेशीर पत्राने ‘ग्रामसेवक’चे असहकार आंदोलन गुंडाळले; ग्रामसेवक युनियन संघटनेत सोमवारी बैठक

त्या ठिकाणी घरोघरी या द्रावणाच्या बाटल्यांचा उपयोग करून पाणी शुद्धीकरण करण्याबाबत जनजागृती करावी, सध्या पिण्याच्या पाण्याची उपलब्धता उन्हाळ्यामुळे कमी झाल्याने बऱ्याच स्रोतांची पाणीपातळी कमी झालेली असून, पर्यायी स्रोतांचा वापर करण्यापूर्वी स्रोतांचे उत्तम दर्जाचे टीसीएल पावडर वापरून शुद्धीकरण करून घेण्यात यावे व पाणी नमुने नजीकच्या प्रयोगशाळेत तपासूनच घ्यावे.

तसेच ज्या ग्रामपंचायतीस टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असेल, त्या टँकरचे पाणी शुद्धीकरण केल्याशिवाय जनतेस पाणीपुरवठा करू नये, नदीकाठच्या गावांची यादी तयार करावी. त्यानुसार कितो स्रोत बाधित होण्याची शक्यता आहे, याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी या वेळी दिले.

Check drinking water sources before monsoon
Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या निर्मलवारी प्रस्तावाचा घोळ सुरूच; संत निवृत्तिनाथ महाराज विश्वस्तांची धरसोडवृत्ती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.