Nashik ZP Digital School : शाळांचे डिजिटलायझेशन, रंगकाम पेंटरांच्या पथ्थ्यावर! जिल्ह्यातील कामांमुळे मिळतो रोजगार

ZP Digital School : शिक्षणाच्या नव्या प्रवाहात सर्वत्र बदलाचे वारे वेगाने वाहत आहेत. मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा' या उपक्रमाने डिजिटल रंगरंगोटीला पुन्हा जोर मिळाला.
The beautifully painted Zilla Parishad Primary School here
The beautifully painted Zilla Parishad Primary School hereesakal
Updated on

Nashik ZP Digital School : शिक्षणाच्या नव्या प्रवाहात सर्वत्र बदलाचे वारे वेगाने वाहत आहेत. मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा' या उपक्रमाने डिजिटल रंगरंगोटीला पुन्हा जोर मिळाला. बदलत्या तंत्रज्ञानात आपली शाळा आकर्षक व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात डिजिटल चळवळ विस्तारली आहे. शाळेचे बाह्यांग व अंतरंग आकर्षक करण्यासाठी रंगरंगोटीचा वापर होत आहे. (Nashik ZP Digital School employment through zp schools of painter marathi news)

यामुळे या शाळांच्या माध्यमातून थोड्या फार प्रमाणात रोजगार मिळाला आहे. अलीकडे रंगकाम मजूर महाग झाला आहे. एक वर्गखोली रंगविणे, चित्रमय करणे यासाठी १५ ते १८ हजार रुपये खर्च लागत आहे. यात शाळेचा व्हरांडा बोलका करणे, शाळेतील स्मार्ट क्लासरूम अंतर्गत कार्टून, पक्षी-प्राणी यांचे चित्र, विविध तक्ते, बाहा भागात स्वच्छता संदेश, फर्निचरवर नावे टाकून घेणे, समित्या फलक लेखन, प्रवेशद्वार रंगविणे आदी कामांची मजुरी, त्यासाठी रंगकाम व शाळेची सजावट याची खर्चाची महागडी बाजू पाहता अनेक शिक्षक स्वतःच आपला वर्ग 'डिजिटल' करीत आहेत.

मोठ्या प्रमाणात डिजिटल, ई- लर्निंग, ज्ञानरचनावादी, मॉडेल स्कूल झाल्या आहेत. या सर्वच शाळांमध्ये रंगरंगोटी, वर्गखोल्या रंगकाम करण्यात आले. या बदलणाऱ्या शाळांसाठी ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी नागरिक, युवक मंडळे, गावस्तरावरील सर्व पदाधिकारी, अनेक संस्था, रोटरी क्लब, सेवाभावी घटक सरसावले आहेत. सर्वत्र आकर्षक व स्वच्छ, सुंदर वातावरणामुळे अनेक विद्यार्थी खासगी शाळांकडून पुन्हा परत येत आहेत. भिंतीसाठी पेंटींग व रंगकामामुळे पेंटरांना चांगला आधार आहे.(latest marathi news)

The beautifully painted Zilla Parishad Primary School here
Nashik ZP School : येवला मतदारसंघातील जि. प. शाळांच्या दुरुस्तीसाठी 2 कोटींचा निधी

''डिजिटल शाळांच्या कामामुळे अनेक पेंटर बांधवांना रोजगार उपलब्ध झाला आहे. सुटीच्या दिवशीही गुरुजी स्वतः रंगकाम करून घेण्यासाठी सहकार्य करतात. चित्रकार म्हणून आमच्या कलेचे मोल होत नाही, पण या कामांमुळे काहीशी दिलासा मिळत आहे.''- मनोज आहिरे, पेंटर, रावळगाव (ता. मालेगाव)

''ग्रामीण भागातील बहुतेक सर्व शाळांमध्ये आकर्षक पेंटिंग्ज केल्याने शाळा बोलक्या झाल्या. विद्यार्थ्यांनाही आपली शाळा चित्रमय झाल्याने आनंददायी व मनोरंजक वातावरण प्रसन्न वाटते.''- छाया पाटील, शिक्षिका, हनुमाननगर प्राथमिक शाळा

The beautifully painted Zilla Parishad Primary School here
Nashik ZP School News : जि. प. शाळांत 219 वर शिक्षकांची आज नियुक्ती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.