Nashik ZP News : औषध निर्माण अधिकारी परीक्षेचा निकाल जाहीर

Nashik News : औषध निर्माण अधिकारी या पदाच्या परीक्षेचा निकाल आयबीपीएसकडून प्राप्त झाल्यानंतर मंगळवारी (ता. २१) मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मान्यतेने जाहीर करण्यात आला आहे.
Result
Result sakal
Updated on

Nashik News : ग्राम विकास विभागाच्या मान्यतेनुसार २ नोव्हेंबर २०२३ ला घेण्यात आलेल्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ व २१ व २६ डिसेंबरला घेण्यात आलेल्या औषध निर्माण अधिकारी या पदाच्या परीक्षेचा निकाल आयबीपीएसकडून प्राप्त झाल्यानंतर मंगळवारी (ता. २१) मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मान्यतेने जाहीर करण्यात आला आहे. (ZP Drug Manufacturing Officer Exam Result Declared)

जिल्हा परिषदेच्या https://zpnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. औषध निर्माण अधिकारी या पदाच्या २० जागांकरिता २१ व २६ डिसेंबर २०२३ ला ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेला एकूण पाच हजार ५७ परीक्षार्थीनी ऑनलाइन अर्ज सादर केले होते.

त्यापैकी तीन हजार ९० परीक्षार्थी परीक्षेला उपस्थित होते. प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाच्या १४ जागांसाठी ददोन हजार ६०७ ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी एक हजार ३३४ परीक्षार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते. जिल्हाधिकारी जलज शर्मा व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शन व नियंत्रणाखाली. (latest marathi news)

Result
Nashik News : चला पोहायला आठवणींच्या हिंदोळ्यात! चांदोरीत पोहण्याचा आगळा-वेगळा सोहळा

तसेच जिल्हा परिषदेच्या परीक्षेकरिता ‘नोडल अधिकारी’ उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्या उपस्थितीत आयबीपीएस या संस्थेकडून ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. भरारी पथकप्रमुख अतिरिक्त मुख्य कार्यकारी अर्जुन गुंडे व प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, प्रत्येक परीक्षा केंद्राकरिता ‘व्हेन्यू ऑफिसर’ व सहाय्यक अधिकारी यांची नियुक्त्या करण्यात आल्या होत्या.

यातून प्रारूप निवडयादी व प्रारूप प्रतीक्षायादी तयार करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात येईल. त्यांच्या मान्यतेने सदर यादीतील उमेदवार यांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.

Result
Nashik News : आरटीईसाठी 10 शाळांची करावी लागेल निवड; एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास ठरणार बाद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.