Nashik ZP News : परस्पर सुट्टी घेणाऱ्या उपशिक्षणाधिकाऱ्यास नोटीस

Nashik News : मुख्यकार्यकारी अधिकारी यांना न कळवताच सुट्टीवर गेलेल्या या उपशिक्षणाधिकाऱ्यास प्रशासनाने नोटीस बजावत, खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.
Nashik ZP News : परस्पर सुट्टी घेणाऱ्या
उपशिक्षणाधिकाऱ्यास नोटीस
Updated on

Nashik News : जिल्हा परिषद प्रशासनाला न कळविता परस्पर सुट्टी घेणे प्राथमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकाऱ्यास भोवले आहे. मुख्यकार्यकारी अधिकारी यांना न कळवताच सुट्टीवर गेलेल्या या उपशिक्षणाधिकाऱ्यास प्रशासनाने नोटीस बजावत, खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, यावरून प्रशासनाने शिक्षणाधिकारी यांनाही सुनावले असल्याचे बोलले जात आहे. (Mutual vacation takers Notice to Deputy Education Officer)

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी घरगुती लग्नानिमित्त रजेवर होते. ही रजा संपल्यानंतर ते हजर झाले अन दुसऱ्या लग्नासाठी पुन्हा रजेवर गेले. ही रजा घेताना त्यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी शिक्षणाधिकारी यांची परवानगी घेतली त्यावेळी शिक्षणाधिकारी यांनी रजेचा अर्ज मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवून मंजुरी घेऊ असे सांगितले.

त्यामुळे उपशिक्षणाधिकारी यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी यांची परवानगी अथवा त्यांना कळविताच चार दिवस सुट्टीवर गेले. शिक्षण विभागातील बैठकी दरम्यान ही बाब मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या निर्दशनास आली असता त्यांना विचारणा केली. (latest marathi news)

Nashik ZP News : परस्पर सुट्टी घेणाऱ्या
उपशिक्षणाधिकाऱ्यास नोटीस
Nashik ZP School : हाणामारी करणारे दिंडोरीतील 2 शिक्षकांचे निलंबन!

त्यावर, उपशिक्षणाधिकारी यांनी शिक्षणाधिकारी यांना कळविल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर संतप्त झालेल्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी उपशिक्षणाधिकारी यांची चांगलीच खरडपट्टी काढली.

त्यानंतर, उपशिक्षणाधिकारी यांना प्रशासनाने नोटीस देखील बजावत, त्याबाबत खुलासा करण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान, या रजेची परवानगी देण्यावरून शिक्षण विभागात वाद झाल्याची चर्चा विभागात रंगली होती.

Nashik ZP News : परस्पर सुट्टी घेणाऱ्या
उपशिक्षणाधिकाऱ्यास नोटीस
Nashik Lok Sabha Constituency : स्थानिक मुद्यांवर रोष कायम; मताधिक्याबाबत उत्सुकता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.