Nashik ZP News : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर यादरम्यान ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे.
अभियानात ‘कचरामुक्त भारत’बाबत विविध उपक्रमांतून जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली. (Nashik ZP News Swachhta Hi Seva initiative fortnight in district ceo Ashima Mittal)
‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत दर वर्षी १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात येते. तसेच २ ऑक्टोबर हा दिवस ‘स्वच्छता दिवस’ म्हणून साजरा होतो. या वर्षीही केंद्र शासनाने हे अभियान राबविण्याचे निर्देश दिले आहेत.
‘स्वच्छता ही सेवा २०२३’ ची थीम ‘कचरामुक्त भारत’ ही आहे. यामध्ये दृश्यमान स्वच्छता व सफाईमित्र कल्याण यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील बसस्थानक, पर्यटन स्थळे, ऐतिहासिक वास्तू, वारसा स्थळे, नदी किनारे, सार्वजनिक ठिकाण येथे श्रमदानातून स्वच्छता करावयाची आहे. तसेच सार्वजनिक शौचालय, कचराकुंड्या, कचरा वाहतूक वाहन आदी सर्व स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून दुरुस्ती, रंगकाम, साफसफाई करण्याचे निर्देश आहेत.
त्यानुसार सर्व गटविकास अधिकाऱ्यांना लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्याने गेल्या वर्षी या अभियानात उत्कृष्ट काम केले असून, या वर्षीही सर्व उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश श्रीमती मित्तल यांनी दिले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
केंद्रीय मंत्री साधणार ऑनलाइन संवाद
केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते १५ सप्टेंबरला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाचा प्रारंभ होणार आहे.
संवाद कार्यक्रमाद्वारे ते सरपंच, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी तसेच शहरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचे इतर अधिकारी यांच्याशी संवाद साधतील, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.