Nashik ZP News : जि. प. मध्ये अखेरच्या दिवशी सादर झाली तीनशेवर बिले! मार्चअखेरीची धावपळ

ZP Nashik latest marathi news
ZP Nashik latest marathi newsesakal
Updated on

Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या लेखा व वित्त विभागाकडून यंदा ऑफलाईन देयके काढली जाणार असले तरी, मार्च एण्ड संपविण्यासाठी १३ मार्च ही डेटलाईन विभागाना देण्यात आली होती.

त्यामुळे अखेरच्या दिवशी गुरूवारी (ता.१३) देयके सादर करण्यासाठी विभागप्रमुखांनी गर्दी केली होती. दुपारनंतर तब्बल २५० ते ३०० बिले लेखा व वित्त विभागात सादर झाल्याचे बोलले जात आहे. (Nashik ZP News Three hundred bills presented on last day)

निधी अखर्चित राहिल्यास तो परत जाऊन राज्य पातळीवर प्रशासनाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण होईल, यामुळे जिल्हा नियोजन समिती, जिल्हा कोषागार विभाग व जिल्हा परिषदेसह इतर सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय साधत कार्यारंभ आदेश दिलेल्या सर्व कामांची देयके काढून घ्यायची व नंतर जूनअखेरपर्यंत ही कामे संबंधित ठेकेदारांकडून करून घ्यायची, असे निश्चित केले.

त्यामुळे ३१ मार्च संपुष्टात आला तरी, देयके काढण्याचे काम सुरू राहणार असे सांगितले जात होते. मात्र, शासनाच्या तोंडी आदेशान्वये १३ एप्रिल पर्यंतच देयके स्वीकारण्याची प्रशानाने निर्णय घेतला. त्यासाठी विभागाकडे बिलेही मागविण्यात आली.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

ZP Nashik latest marathi news
Unseasonal Rain : गारपिटीने 658 कोटींच्या पिकांची धूळधाण! बागलाणचे ५३ टक्के नुकसान

मात्र, एकाही विभागप्रमुखांनी गत तीन दिवसात बिले सादर केली नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी रजेवर असल्याने अनेकांनी या आदेश धुडकावून लावला. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले अर्जुन गुंडे यांना बोलावलेल्या बैठकीस देखील विभागप्रमुखांनी दाद दिली नाही.

अखेर, गुरूवारी बिले सादर करण्याचा अखेरचा दिवस असल्याचे लेखा विभागाकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतर विभागप्रमुखांनी धावपळ करत बिले सादर केली. यातही दुपारनंतर बिले सादर करण्यासाठी गर्दी झाली होती.

दोन ते तीन तासातच ही बिले सादर झालेली आहे. अचानक सादर झालेली देयके काढण्यासाठी आता लेखा विभागास कसरत करावी लागणार आहे.

ZP Nashik latest marathi news
Sula Vineyards : सुला विनयार्डसला आर्थिक वर्ष लाभदायी! प्रीमियम उत्पन्नात 30 टक्के वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.