Nashik ZP News : बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दाखल केल्याप्रकरणी संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या आदेशाला गटविकास अधिकारी, पोलिस यांनी धुडकावून लावला आहे. गुन्हा दाखल करण्याचे आदेश मिळूनही गुन्हा दाखल केला जात नसल्याने यामागे राजकीय दबाब असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. (Nashik ZP not hesitate to file case against village development officer marathi news)
ग्रामविकास अधिकारी संजय पाटील यांनी बदलीसाठी सादर केलेले दिव्यांग प्रमाणपत्र बोगस असल्याचे चौकशी अहवालातून निष्पन्न झाले होते. याप्रकरणी श्री. पाटील यांनी शासनाची फसवणूक केल्याने त्यांचे निलंबन करत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी मागील महिन्यात दिले होते. परंतु श्रीमती.
मित्तल यांनी दिलेल्या आदेशाला गटविकास अधिकारी यांनी केराची टोपली दाखविली. याची ओरड झाल्यावर गटविकास अधिकारी यांनी बदलीतील कागदपत्रे नसल्याचे कारण दिले. यावर प्रशासनाने तत्काळ कागदपत्रांची पुर्तता केली. कागदपत्रे मिळाल्यानंतर गटविकास अधिकारी सिन्नर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता, या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांकडून टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून आले. (latest marathi news)
श्री. पाटील यांनी दिंडोरी तालुक्यातून बदलीहून आलेली असल्याने तेथे गुन्हा दाखल करण्यात यावा असे सांगितले जात होते. तर, दिंडोरीतून बदलीहून चार महिने झालेले असल्याने येथे गुन्हा दाखल होऊ शकत नसल्याचे दिंडोरी पोलिसांकडून सांगितले. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यास पोलिस प्रशासन वेळकाढूपणा करत असल्याची चर्चा सुरू आहे. पोलिसांकडून टाळाटाळ केली जात असली तरी प्रत्यक्षात यामागे राजकीय दबाब असल्याचे बोलले जात आहे.
''गटविकास अधिकारी यांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र, पोलिस गुन्हा दाखल करून घेत नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, यावर पोलिस अधिक्षक यांच्याशी चर्चा करणार आहे. गुन्हा केला आहे, दोषींवर गुन्हा दाखल होणारचं.''- आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.