Nashik ZP News : यंदाच्या सुपर 50 उपक्रमात 110 विद्यार्थ्यांना संधी; 21 जुलै रोजी होणार निवड चाचणी

Nashik News : जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेला सुपर ५० हा उपक्रम यंदाही राबवण्यात येणार आहे. यंदा या उपक्रमात ११० विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
Nashik ZP News
Nashik ZP Newsesakal
Updated on

Nashik News : जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेला सुपर ५० हा उपक्रम यंदाही राबवण्यात येणार आहे. यंदा या उपक्रमात ११० विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्ज सादर करण्यास १५ जुलै २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. २१ जुलै २०२४ रोजी यासाठी परीक्षा घेतली जाणार आहे. (Opportunity for 110 students in this year Super 50 initiative)

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी यामध्ये जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे. शैक्षणिक वर्ष २०२४ -२५ व २०२५ -२६ या दोन वर्षांसाठी सदर उपक्रमास एकूण ११० विद्यार्थ्यांची (५५ जेईई’ साठी व ५५ ‘नीट’ साठी) उपक्रमाच्या निकषाच्या आधारे निवड करण्यात येणार आहे.

यासाठी असलेली प्रक्रीया जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. यापूर्वी प्रवेश अर्ज सादर करण्याचे मुदत ७ जुलैपर्यंत देण्यात आली होती. १४ जुलै रोजी परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र विद्यार्थ्याचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता जिल्ह्यातील पात्र विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी जिल्हा परिषदेकडून ऑनलाइन प्रवेश अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे.

सुधारित नियोजनानुसार ऑनलाइन प्रवेश अर्ज सादर करण्यास १५ जुलैपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. २१ जुलै रोजी सकाळी ११ ते १.३० यावेळेत यासाठी परीक्षा होईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना निःशुल्क निवासी स्वरूपाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. निवड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन गुगल फॉर्मद्वारे प्रवेश अर्ज सादर करावा लागणार आहे. (latest marathi news)

Nashik ZP News
Nashik Bus Accident : बस दरीत कोसळून 2 मुलांचा मृत्यू! सापुतारा घाटात अपघात; जखमींना रुग्णालयात हलवले

सदरचे गुगल फॉर्मची लिंक सर्व गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी (शिक्षण) यांचेमार्फत सर्वत्र उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येणार नाही त्यांनी तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन ऑनलाइन प्रवेश अर्ज भरून घ्यावयाचा आहे.

या उपक्रमाच्या नियम निकषान्वये जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शासकीय, अनुदानित, अंशतः अनुदानित विद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मित्तल यांनी केले आहे.

अशी होईल परिक्षा

जेईई’ अभ्यासक्रमासाठी फिजिक्स, केमिस्ट्री, गणित व इंग्रजी यात मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार असून ‘नीट’ अभ्यासक्रमासाठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी व इंग्रजी यात मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे.

Nashik ZP News
Nashik Railway : सलग दुसऱ्या दिवशी ‘पंचवटी’सह अनेक गाड्या रद्द! नाशिकच्या प्रवाशांचे हाल

यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, गणित व इंग्रजी या विषयांवर प्रत्येकी २५ प्रश्न असून प्रत्येकी २५ गुण असणार आहेत. विद्यार्थ्यांना आपले बैठक क्रमांक हे जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असून प्रत्येक तालुकास्तरावर परीक्षा केंद्र असणार आहे.

या लिंकवर भरा अर्ज, गुगल Form वर भरणेची लिंक -

https://docs.google.com/forms/d/1LTHPFXTHl36Btz1YXY9w4Sj_4BfKFO_CKPDOl8tL3Ak/edit0ts=6683b1d0https://docs.google.com/forms/d/1LTHPFXTHl36Btz1YXY9w4Sj_4BfKFO_CKPDOl8tL3Ak/edit0usp=sharing_eil_se_dm&ts=6683b1d0

Nashik ZP News
Nashik News : आयुक्तालयातील प्रभारींवर ‘खांदेपालटा’ची टांगती तलवार; सहायक आयुक्तांमध्ये फेरबदलाची चर्चा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.