Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाने दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला एक, याप्रमाणे पंधरा प्लॅस्टिक मोल्डिंग मशिन खरेदी करण्यासाठी राबविलेली निविदाप्रक्रिया पूर्ण होऊन दीड वर्ष उलटले. त्यानंतर कार्यारंभ आदेश देऊन नऊ महिने झाले असून, पुरवठादाराला मुदतवाढ देऊनही अद्याप एकही प्लॅस्टिक मोल्डिंग यंत्र सुरू झालेले नाही. (Nashik ZP Plastic molding project not going ahead despite )
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन टप्पा दोनअंतर्गत प्लॅस्टिक कचरा संकलन करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी प्रत्येक तालुकानिहाय एक प्लॅस्टिक मोल्डिंग यंत्र देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाला २.४० कोटी रुपये निधी दिला आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने फेब्रुवारी २०२२ मध्ये याची निविदाप्रक्रिया राबविली. ती निविदाप्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्याने फेरनिविदा राबविली गेली.
राज्यातील इतर जिल्हा परिषदांनी या १६ लाख रुपयांमध्येच मशिन व ते ठेवण्यासाठीची व्यवस्था उभारली असताना, जिल्हा परिषदेने १४ लाख रुपये दराने १५ यंत्रांची खरेदीप्रक्रिया करून पुरवठादारास जुलै २०२३ मध्ये कार्यारंभ आदेश दिले. यात प्रशासनाने सर्व निधी या मशिन खरेदीसाठीच खर्च केला. प्लॅस्टिक मोल्डिंग मशिन चालविण्यासाठी, शेड खरेदी करण्यासाठी निधीची तरतूद नसल्यामुळे जिल्हा परिषदेने त्याची जबाबदारी ग्रामपंचायतींवर टाकली. (latest marathi news)
ग्रामपंचायतींनी ग्रामनिधी अथवा पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून खर्च करावा, अशा सूचना जिल्हा परिषदेने दिल्या. त्यानुसार या ग्रामपंचायतींनी कामे केली आहेत. त्यापैकी कळवण तालुक्यातील कनाशी येथील शेडचे काम अद्याप अपूर्ण आहे. ते काम या महिन्यात पूर्ण होणार असल्याचे ग्रामपंचायतींकडून सांगितले जात आहे. उर्वरित १४ शेडची कामे पूर्ण झाली असली, तरी तेथे अद्याप मोल्डिंग मशिन बसविण्यात आलेली नाहीत. या ठिकाणी वीजजोडणी मिळालेली नसल्याचे कारण दिले जात आहे.
प्रकल्प सुरू असल्याचा दावा
दरम्यान, पंधरा ठिकाणच्या प्लॅस्टिक मोल्डिंग मशिन बसविण्याची बहुतांश ठिकाणची कामे पूर्ण होत आले असून, आता केवळ वीजजोडणी बाकी असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. नऊ ठिकाणी वीजजोडणी झाली आहे. लवकरच हे सर्व प्रकल्प सुरू होतील, असा दावा जिल्हा परिषदेकडून केला जात आहे.
प्रकल्प उभारणाऱ्या ग्रामपंचायती
शिंदे दिगर (दिंडोरी), वाडीवऱ्हे (इगतपुरी), मुसळगाव (सिन्नर), अंदरसूल (येवला), वाघेरा (त्र्यंबकेश्वर), कनाशी (कळवण), कोळीपाडा (पेठ), टेहेरे (बागलाण), उमराणे (देवळा), वडनेरभैरव (चांदवड), करंजाळी (सुरगाणा), पिंप्री सय्यद (नाशिक), पिंपळगाव बसवंत (निफाड), नागापूर (नांदगाव), टेहेरे (मालेगाव).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.