Nashik ZP Recruitment: जि. प. च्या 8 पदांसाठी 7 ऑक्टोबरपासून परीक्षा

exam
examesakal
Updated on

Nashik ZP Recruitment : जिल्हा परिषदेतर्फे विविध संवर्गांसाठी पदभरती करण्यात येत असून, रिंगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्ताराधिकारी (सांख्यिकी), विस्ताराधिकारी (कृषी), आरोग्य पर्यवेक्षक, लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुलेखक (उच्चश्रेणी), कनिष्ठ सहाय्यक लेखा या आठ संवर्गातील पदांसाठी येत्या ७ ते ११ ऑक्टोबरदरम्यान आयबीपीएस कंपनीच्या वतीने विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे. (Nashik ZP Recruitment Examination from 7th October for 8 posts)

जिल्हा परिषद पदभरतीचे सुधारित वेळापत्रक व परीक्षा केंद्र यासाठीचे प्रकटन हे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सदस्य जिल्हा निवड समिती आशिमा मित्तल यांच्यातर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेच्या वेबसाइटवर हे प्रकटन उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व परीक्षार्थींनी याबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. हॉलतिकीट आयबीपीएस कंपनीच्या खालील लिंकवरून डाउनलोड करता येईल. http://ibpsonline.ibps.in/zpvpjun२३/oecla_sep२३/login.phpappid=f०bd२b०३८१८a५edbf९०१६२६९७८e५३c०४.

exam
Nashik ZP : कंत्राट रद्द करण्यावरून जि प प्रशासनाचा यू टर्न; काम रेंगाळत ठेवणारा ठेकेदार करणार दुरुस्तीचे काम

असे आहे परीक्षांचे वेळापत्रक

७ ऑक्टोबर - रिंगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लेखा)

८ ऑक्टोबर - विस्ताराधिकारी (सांख्यिकी)

१० ऑक्टोबर - विस्ताराधिकारी (कृषी), आरोग्य पर्यवेक्षक

११ ऑक्टोबर - लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुलेखक (उच्चश्रेणी), कनिष्ठ सहाय्यक (लेखा)

exam
Swachh Bharat Abhiyan: जिल्हाभरात सोमवारी एक तास श्रमदानाचा उपक्रम : ZP CEO मित्तल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()