Nashik ZP School : तिसरीपर्यत यावे वाचन, लेखन आणि गणित; जि. प. शाळांमध्ये निपुण भारत पॅटर्न

ZP School : नवीन शैक्षणिक धोरणात तिसरीच्या शेवटी विद्यार्थी वाचू, लिहू आणि गणित सोडवू शकतील, या उद्देशाने निपुण भारत अभियान पॅटर्न अभियान दिले आहे.
ZP School
ZP Schoolesakal
Updated on

Nashik ZP School : नवीन शैक्षणिक धोरणात तिसरीच्या शेवटी विद्यार्थी वाचू, लिहू आणि गणित सोडवू शकतील, या उद्देशाने निपुण भारत अभियान पॅटर्न अभियान दिले आहे. त्यानुसार आता जिल्हा परिषदेच्या एकूण तीन हजार २६५ प्राथमिक शाळांमध्ये अंगणवाडी तसेच पहिली ते तिसरीपर्यंत निपुण भारत अभियान पॅटर्न राबविले जाणार आहे. या अंतर्गत गणिताची आकडेवारी, सामान्य ज्ञान तसेच आवडेल अशा शिक्षणक्रमावर भर देण्यात येणार आला. (Nashik ZP School Reading Writing and Mathematics should come to third standard marathi news)

यात विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना मूलभूत वाचन आणि अंकगणित कौशल्ये शिकविणे हे निपुण भारत योजनेचे उद्दिष्ट आहे. २०२६-२७ पर्यंत या योजनेद्वारे तिसरीच्या शेवटी विद्यार्थी वाचू, लिहू आणि गणित सोडवू शकतील. या योजनेचा मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी फायदा होईल.

निपुण भारत योजना मुलांना मूलभूत साक्षरता आणि अंककौशल्ये वेळेवर शिकण्यास मदत करेल. यामुळे त्यांची मानसिक आणि शारीरिक क्षमता विकसित होण्यास मदत होईल. शिक्षण आणि साक्षरता विभाग निपुण भारतचे व्यवस्थापन करेल. ही योजना शालेय शिक्षण कार्यक्रम, समाजशिक्षाबरोबर एकत्रित केली जाईल.

नवीन शैक्षणिक धोरणावर आधारित ही योजना आहे. निपुण भारत योजना मुलांना संख्या, माप आणि आकार यांचे तर्कशास्त्रही शिकवील. यात मूलभूत साक्षरता आणि संख्यापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. हे साध्य करण्यासाठी राज्य पातळीवर विविध कार्यक्रम असतील. नोडल विभाग या उद्दिष्टांच्या प्रगतीचा आढावा घेईल. (latest marathi news)

ZP School
Nashik ZP Schools: 343 वर्गखोल्यांची होणार दुरुस्ती; जिल्‍ह्यात 267 नवीन वर्गखोल्यांना मंजुरी

ही योजना कार्यान्वित करण्यासाठी राज्याला समाजशिक्षाकडून आर्थिक आणि तांत्रिक सहाय्यही मिळणार आहे. नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी आवश्यक ती तयारी नाशिक जिल्हा परिषदेकडून पूर्ण झाल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर कनोज यांनी दिली.

शाळेतच भरणार अंगणवाडी

निपुण भारत पॅटर्न अंतर्गत अंगणवाडी आता प्राथमिक शाळेच्या आवारातच भरविली जाणार असून, अंगणवाडीच्या मुलांना शाळेच्या वातावरणाशी ओळख व्हावी म्हणून पहिलीच्या वर्गातही त्यांना बसवून अक्षर ओळख करून दिली जाणार आहे.

पहिलीच्या विद्यार्थ्यांना ९९ पर्यंतची आकडेमोड, दुसरीच्या विद्यार्थ्यांना ९९९ पर्यंत आकडेमोड, तर तिसरीच्या विद्यार्थ्यांना ९९९९९ पर्यंतची आकडेमोड (बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार) शिकविले जाईल. याचबरोबर २०२५-२६ पर्यंत या मुलांना कौशल्याधिष्ठीत शिक्षणक्रम शिकविण्याची तयारी करण्यात येणार असून, मुले जसजशी पुढील इयत्तेत जातील, त्याप्रमाणे त्यांच्या शिक्षणाला व्यावसायिक शिक्षणाची जोड देण्यात येणार आहे.

ZP School
Nashik ZP School: संतप्त पालकांनी लावले शाळेला कुलूप; शिक्षकांनी बाहेरच भरविली शाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.