Nashik ZP News : विद्यार्थ्यांना गणवेशाआधी बूट, पायमोजे

Nashik News : जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांपाठोपाठ बूट व पायमोजेही मिळणार आहेत. मात्र, शाळा सुरू होऊन तीन दिवसांचा कालावधी उलटूनही गणवेश मिळालेले नाहीत.
Nashik ZP School News
Nashik ZP School Newsesakal
Updated on

Nashik News : जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांपाठोपाठ बूट व पायमोजेही मिळणार आहेत. मात्र, शाळा सुरू होऊन तीन दिवसांचा कालावधी उलटूनही गणवेश मिळालेले नाहीत. मोफत गणवेश योजनेंतर्गत एकजोडी बूट व दोन जोडी पायमोजे यांच्यासाठी प्रत्येकी १७० रुपये प्राप्त होणार आहेत. (ZP school Shoes socks before uniform for students)

यासाठी जिल्ह्यातील दोन लाख ६६ हजार ९९९ विद्यार्थ्यांसाठी असलेला चार कोटी ५५ लाख ५९ हजारांचा निधी वर्ग करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक वर्षाला १५ जूनपासून प्रारंभ झाला. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करत विद्यार्थ्यांचे जुन्याच गणवेशात वाजतगाजत स्वागत करण्यात आले.

शासनाच्या गलथान कारभारामुळे वेळेत नवीन गणवेश प्राप्त न झाल्याने पहिल्या दिवशी गणवेश मिळू शकले नाहीत. शाळा सुरू होऊन तीन दिवस झालेले असले, तरी नवीन गणवेशाबाबत अद्यापही कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. गणवेश मिळालेला नसताना मोफत बूट व पायमोजे यांचे अनुदान मात्र शासनाकडून प्राप्त झाले आहे.

२०२४-२५ या शैक्षणिक वर्षात पहिली ते आठवीमधील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून शिक्षण घेत असलेल्या सर्व मुला-मुलींना मोफत गणवेश योजनेंतर्गत एकजोडी बूट व दोन जोडी पायमोजे शाळा व्यवस्थापन समितीमार्फत उपलब्ध करून देण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या. (latest marathi news)

Nashik ZP School News
Nashik NMC : ‘सी ॲन्ड डी’ वेस्ट प्रकल्प निधीअभावी लांबणीवर

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पात्र सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांच्या एक जोडी बूट व दोन जोडी पायमोजे पुरविण्याकरिता १७० रुपयांप्रमाणे दोन लाख ६७ हजार ९९९ पात्र विद्यार्थ्यांकरिता चार कोटी ५५ लाख ५९ हजार ८३० रुपयांचे अनुदान जिल्हा कार्यालयास ‘पीएफएमएस’ प्रणालीवर प्राप्त झाले आहे. हे अनुदान समग्र शिक्षा अंतर्गत जिल्ह्यातील १५ गटांकडून प्राप्त प्रत्यक्ष मागणीनुसार वर्ग करण्यात आले आहे.

गणवेश बूट/पायमोजे योजनेची मंजूर तरतूद इतर कोणत्याही बाबीवर खर्च करण्यात येऊ नये. मंजूर तरतूद शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने खर्च करण्यात यावा. बूट/पायमोजे पुरवठ्याबाबत संपूर्ण अधिकारी हे संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीत असल्याने, शाळा व्यवस्थापन समितीऐवजी कोणत्याही वरिष्ठ पातळीवर (केंद्र, बीट, तालुका) स्तरावरून पुरवठ्याबाबतचे कोणतेही निर्णय घेण्यात येऊ नये, अशा सूचना शिक्षणाधिकारी बच्छाव यांनी दिल्या आहेत.

तालुकानिहाय विद्यार्थी व अनुदान रक्कम (कंसात विद्यार्थी संख्या)

बागलाण (१९ हजार ५३१) ३३ लाख २० हजार २७०, चांदवड ((१४ हजार ८९१) २५ लाख ३१ हजार ४७०, देवळा (८ हजार ४५८) १४ लाख ३७ हजार ८६०, दिंडोरी (२५ हजार ११) ४२ लाख ५१ हजार ८७०.

Nashik ZP School News
Nashik News : धरणसाठा 79 कोटी 10 लाख लिटरने ‘समृद्ध’

इगतपुरी (२१ हजार २७३) ३६ लाख १६ हजार ४१०, कळवण (१३ हजार ३४२) २२ लाख ६८ हजार १४०, मालेगाव (२८ हजार ४८६) ४८ लाख ४२ हजार ६२०, नांदगाव (१८ हजार ६४७) ३१ लाख ६९ हजार ९९०.

नाशिक (१३ हजार ४९१) २२ लाख ९३ हजार ४७०, निफाड (२३ हजार ६१७), पेठ (१३ हजार २५०) ४० लाख १४ हजार ८९०, सिन्नर (१८ हजार ६९१) २२ लाख ५२ हजार ५००, सुरगाणा (१६ हजार ३२२) ३१ लाख ७७ हजार ४७०, त्र्यंबकेश्वर (१५ हजार ९८९) २७ लाख ७४ हजार ७४०, येवला (१७ हजार) २७ लाख १८ हजार १३०, २८ लाख ९० हजार

Nashik ZP School News
Nashik Teacher Constituency : शिक्षक मतदारसंघासाठी नाशिक शहरात 10 केंद्रे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.