Nashik ZP School : हाणामारी करणारे दिंडोरीतील 2 शिक्षकांचे निलंबन!

Nashik News : शिक्षक प्रवीण दिनकरराव देशमुख (दळवी) व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भवानीनगर येथील धनंजय विष्णू क्षत्रिय या शिक्षकांचे प्राथमिक शिक्षण विभागाने निलंबन केले आहे.
ZP School Suspension of 2 teachers
ZP School Suspension of 2 teachersesakal
Updated on

Nashik News : मुख्याध्यापकांच्या झालेल्या बैठकीत हाणामारी करणारे दिंडोरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक तीनचे शिक्षक प्रवीण दिनकरराव देशमुख (दळवी) व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भवानीनगर येथील धनंजय विष्णू क्षत्रिय या शिक्षकांचे प्राथमिक शिक्षण विभागाने निलंबन केले आहे. तर इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे येथील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. (ZP School Suspension of 2 teachers)

नवभारत साक्षरता अभियान, निपुणोत्सव, लोकसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर १३ मार्च २०२४ ला दिंडोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक तीन येथे केंद्रप्रमुखांनी आणि केंद्रातील सर्व मुख्याध्यापकांची बैठक आयोजित केली होती. बैठकीत पूर्ववैमनस्यातून शिक्षक प्रवीण देशमुख (दळवी) व धनंजय क्षत्रिय या दोघांमध्ये हाणामारी झाली.

या घटनेने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. अचानक दोन शिक्षकांच्या ‘त्या’ हाणामारीचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांमध्ये सर्वत्र फिरत असल्याने प्रशासकीय कारभारावर ताशेरे ओढले जात होते. या घटनेची जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने गंभीर दखल घेत दिंडोरी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे अहवाल मागविला होता.

पंचायत समिती प्रशासनाकडून जिल्हा परिषद प्रशासनाकडे कारवाईसाठी प्रस्ताव सादर केला होता. अहवाल सादर होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला होता. तरी कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी शुक्रवारी (ता. २४) बैठक घेत. या दोन्ही शिक्षकांचे निलंबन करण्याचे आदेश शिक्षण विभागास दिले. (latest marathi news)

ZP School Suspension of 2 teachers
Nashik News : पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाई! येवल्यात जेसीबी, पोकलेनद्वारे स्वच्छता मोहीम

त्यानुसार शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी सायंकाळी या दोन्ही शिक्षकांच्या निलंबनाचे आदेश काढले. दुसरीकडे इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे येथील प्राथमिक शाळेला भेट देणार असल्याचे सांगत मित्तल यांनी भेट दिली होती. मात्र त्या वेळी मुख्याध्यापकांसह शिक्षक कुलूप लावून निघून गेल्याचे निदर्शनास आले होते.

त्यावर मित्तल यांनी मुख्याध्यापकांसह शिक्षकांवर कारवाईचे आदेश दिले होते. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याची ओरड सुरू झाली. त्यामुळे शिक्षणाधिकारी बच्छाव यांनी विभागातील उपशिक्षणाधिकाऱ्यांची समिती नियुक्त करत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या समितीने चौकशी करत अहवाल सादर केला.

या प्रकरणी मुख्याध्यापकांवर दोषींचा ठपका ठेवत त्यांना निलंबनाचा देखील निर्णय शुक्रवारी झाला. शाळेतील १२ शिक्षकांना नोटिसा बजाविण्याचाही निर्णय झाला आहे. या कारवाईने शाळा, शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.

ZP School Suspension of 2 teachers
Nashik Lok Sabha Constituency : स्थानिक मुद्यांवर रोष कायम; मताधिक्याबाबत उत्सुकता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.