Nashik ZP School : शिक्षकांच्या हाणामारीचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल! जि. प. प्रशासनाकडून पाठराखण केल्याचा आरोप

Nashik News : दोन शिक्षकांच्या ‘त्या’ हाणामारीचा व्हीडिओ प्रसार माध्यमांमध्ये सर्वत्र फिरत असल्याने प्रशासकीय कारभारावर ताशेरे ओढले जात आहेत.
Teachers scuffle seen in viral video.
Teachers scuffle seen in viral video.esakal
Updated on

लखमापूर : दिंडोरीमध्ये मागील दोन महिन्यांपूर्वी दोन शिक्षकांमध्ये पूर्ववैमनस्यातून झालेल्या हाणामारीच्या घटनेने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. पंचायत समिती प्रशासनाकडून जिल्हा परिषद प्रशासनाकडे कारवाईसाठी प्रस्ताव सादर केलेला असताना देखील दोन महिन्यांपासून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. (Nashik ZP School video of teacher scuffle goes viral)

प्रशासनाकडून कारवाईस विलंब होत असतानाच अचानक दोन शिक्षकांच्या ‘त्या’ हाणामारीचा व्हीडिओ प्रसार माध्यमांमध्ये सर्वत्र फिरत असल्याने प्रशासकीय कारभारावर ताशेरे ओढले जात आहेत. बहुप्रतिक्षेत असलेल्या केंद्रप्रमुखांची पदे पदोन्नतीने भरली गेली. नवीन केंद्रप्रमुखांची ओळख केंद्रातील सर्व शाळांना व्हावी, यासाठी केंद्रस्तरीय शाळेवर बैठका घेवून केंद्रप्रमुखांची ओळख करुन देण्यात आली.

अशातच दिंडोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. ३ मध्ये नवनियुक्त केंद्रप्रमुखांच्या उपस्थितीत केंद्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मागील काळात केंद्रप्रमुखांचा अतिरीक्त कारभार सांभाळणाऱ्‍या एका शिक्षकाने आपण कार्यभार कसा सांभाळला व आलेला अनुभव याविषयी उपस्थितांना माहिती देत असताना नवनियुक्त केंद्रप्रमुख व उपस्थितीत मुख्याध्यापकांसमोर पूर्ववैमनस्यातून दोन शिक्षकांमध्ये शाब्दीक चकमक उडाली.

या चकमकीचे रुपांतर तुंबळ हाणामारीत झाले. हाणामारी इतकी जोरदार झाली की त्यातील एका शिक्षकाचा हात खांद्यापासून निखळल्याची चर्चा आहे. त्यानंतर संबंधित शिक्षक पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यासाठी गेले. पोलिसांनी आधी स्वत: उपचार करुन घ्या, नंतर आपण संबंधितावर गुन्हा दाखल करु, असे सांगून दिंडोरी पोलिस ठाण्याच्या वतीने संबंधित शिक्षकास दिंडोरी ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवले. (latest marathi news)

Teachers scuffle seen in viral video.
Nashik Summer Heat : राज्यातील ‘हॉट’ जिल्ह्यांत नाशिक! पारा चाळिशी पार गेल्याने 10 वर्षांचे ‘रेकॉर्ड ब्रेक’

दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात सदर शिक्षक गेल्यानंतर तेथील वैद्यकीय अधिकाऱ्‍यांनी तपासणी केली. त्या शिक्षकाचा हात खांद्यातून निखळला असल्याचे लक्षात आले. त्यावरील उपचार येथे होणार नसल्याने दिंडोरी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. यासाठी आवश्यक कायदेशीर पूर्तता देखील करण्यात आली. संबंधित शिक्षकाने जिल्हा रुग्णालयात जाण्याऐवजी खासगी रुग्णालयात जावून उपचार करणे पसंत केले.

दरम्यान, सदर बाब गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांच्यापर्यत पोहचताच त्यांनी संबंधित विभागाला सत्यता पडताळणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी लेल्या अहवाल व सत्य परिस्थिती जाणून घेत श्रीमती जगताप व गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी यांनी संयुक्तपणे संबंधित शिक्षकांवर कारवाई करण्यासाठी प्रस्ताव जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठवला.

Teachers scuffle seen in viral video.
Nashik Traffic Rules Break: वाहनांतून धोकादायकरित्या सामानाची वाहतूक! वाहतूक पोलिसांचे दूर्लक्ष; भीषण दूर्घटनेची शक्यता

परंतु, दोन महिने उलटून देखील जिल्हा परिषद प्रशासन या शिक्षकांवर कोणतीही कारवाई करीत नसल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे आता समाज माध्यमांवर संबंधित शिक्षकांच्या हाणामारीचा व्हीडिओ व्हायरल होत असल्याने सर्व स्तरातून शिक्षण विभागावर टीकेचे झोड उठत आहे. या प्रकारामुळे जिल्हा परिषदेमधील सेटिंग प्रक्रियेची चर्चा जोरदार सुरू आहे. आता तरी प्रशासन जागे होऊन संबंधितांवर कार्यवाही करेल का, असा सवाल उपस्थित होत आहे.

प्रशासनाची दिशाभूल

शिक्षण विस्तार अधिकाऱ्‍यांनी उपस्थितीत केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांकडून घडलेल्या माहितीचा खुलासा मागविला असता प्रत्यक्षदर्शी असतांना आपल्या जबाबात असे काही गंभीर घडलेच नसल्याचे सांगण्यात आल्याची चर्चा आहे. उपस्थित केंद्रप्रमुख मुख्याध्यापक व शिक्षकांसमोर दोन शिक्षकांची तुंबळ हाणामारी होते. तरी देखील तसे काही घडलेच नसल्याचे प्रशासनाला लेखी लिहून देत चुकीच्या कृतीची पाठराखण केल्याने ते देखील तितकेच दोषी असल्याची चर्चा आहे.

Teachers scuffle seen in viral video.
Nashik News : विनाहेल्मेट चालकांना हेल्मेटचे वाटप; शहर वाहतूक शाखा-फिजिक्स क्लासचा संयुक्त उपक्रम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.