Nashik ZP School : शिक्षक मोर्चाने जि. प. शाळांना अघोषित सुटी; सामुदायिक रजा आंदोलनात 98 टक्के शिक्षक

ZP School : शिक्षकभरतीचा शासन निर्णय रद्द होणे यांसह प्रलंबित मागण्यांसाठी एकटविलेल्या जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांतर्फे आंदोलन करण्यात आले.
strike
strikeesakal
Updated on

नाशिक : विद्यार्थी व शिक्षक यांच्यावरील संचमान्यतेबाबतचा १५ मार्च २०२४ व कंत्राटी शिक्षकभरतीचा शासन निर्णय रद्द होणे यांसह प्रलंबित मागण्यांसाठी एकटविलेल्या जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांतर्फे बुधवारी (ता. २५) आंदोलन करण्यात आले. आंदोलनासाठी जिल्हा परिषदेतील ९९ टक्के शिक्षकांनी सामुदायिक रजा टाकत आंदोलनात सहभाग नोंदविला. त्यामुळे ग्रामीण भागात जिल्हा परिषदांच्या शाळांना अघोषित सुटी मिळाल्याचे दिसून आले. कंत्राटी शिक्षकभरतीचा शासन निर्णय रद्द होणे यांसह प्रलंबित मागण्यांबाबत शासन उदासीन आहे. ( zp Teacher strike Unannounced holidays to schools

प्राथमिक शिक्षक संघटनांसह चर्चा करून प्रश्न समजून घेणे व त्यावर अनुकूल असा निर्णय घेण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे नाराज झालेल्या सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. याच आंदोलनाचा भाग म्हणून १८ सप्टेंबरला जिल्हाभरातील शिक्षकांनी काळ्या फिती लावून शासनाचा विरोध केला. तसेच कामकाजाच्या दृष्टीने असलेल्या सर्व प्रकारच्या प्रशासनिक व्हॉट्सअॅप ग्रुपवरून शिक्षक बाहेर पडलेले आहेत. याच आंदोलनाचा भाग म्हणून सामुदायिक रजा टाकत आंदोलन केले. (latest marathi news)

strike
Nashik ZP News : ग्रामपंचायतींचे अधिकार आता जिल्हा परिषदेला; 15 लाखांपर्यंत कामांचे जि. प. स्तरावरून वाटप

या झालेल्या आंदोलनात जिल्हा परिषदांच्या शाळांमधील कार्यरत असलेल्या १० हजार १९४ शिक्षकांपैकी तब्बल नऊ हजार ९०१ शिक्षकांनी सहभाग घेतल्याचे नोंद प्राथमिक शिक्षण विभागाकडे झाली आहे. तर, २९३ शिक्षक कार्यरत होते. याशिवाय पालिका, नगरपंचायतींचे ८३, महापालिकेचे एक हजार ३०६, तर खासगी शाळांचे दोन हजार ३४७ शिक्षक असे एकूण चार हजार २९ शिक्षक आंदोलनापासून दूर होते. त्यांनी शाळांवर येत नियमित वर्ग घेतल्याचे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाकडून सांगण्यात आले.

strike
Nashik ZP News : जिल्हा परिषद पदभरतीतील 7 संवर्गांचे नियुक्ती आदेश वितरित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.