नाशिक : बदलत्या काळानुसार अध्यापन पद्धतीत होणारे बदल प्रत्येक शिक्षकाला कळावेत, या बदलांचा स्वीकार सर्व शिक्षकांना करता यावा, या उद्देशाने जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्तावाढ आणि शिक्षकांच्या अध्यापन पद्धतीत सुधारणा करण्यासाठी ‘विनोबा’ हे खास मोबाईल अॅप विकसित केले आहे. हे अॅप जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी संज्ञापनाचे ऑनलाइन व्यासपीठ बनले आहे. या अॅपवर जिल्ह्यातील तीन हजार २६४ शाळांची नोंदणी झाली आहे. (Vinoba app online platform for teachers Registration of 3 thousand 264 schools in district )