Nashik ZP News: जि. प. माध्यमिकचे ते कामकाज ‘अवैध’!

जिल्हा परिषदेतील माध्यमिक विभागाचा शिक्षणाधिकारीपदाचा पदभार प्रवीण पाटील यांच्याकडे देण्याचा निर्णय मॅटने दिल्यानंतर पाटील यांनी पदभार स्वीकारत कामकाजाला सुरवात केली.
Nashik ZP
Nashik ZPesakal
Updated on

नाशिक : जिल्हा परिषदेतील माध्यमिक विभागाचा शिक्षणाधिकारीपदाचा पदभार प्रवीण पाटील यांच्याकडे देण्याचा निर्णय मॅटने दिल्यानंतर पाटील यांनी पदभार स्वीकारत कामकाजाला सुरवात केली.

यात त्यांच्या अनुपस्थितीत प्रभारीपदाची धुरा सांभाळत असलेले उपशिक्षणाधिकारी उदय देवरेंचे महिनाभराचे कामकाज अवैध ठरवत, त्यांनी काढलेल्या फायली रद्द केल्याचे बोलले जात आहे. महत्त्वाच्या फायली त्यांनी पुन्हा मागविल्याची चर्चा आहे. (Nashik ZP work of secondary school department illegal news)

Nashik ZP
Nashik MSEB News : औद्योगिक ग्राहकांसाठी आता स्वागत सेल; ‘महावितरण’चा निर्णय

यापूर्वीही पाटील यांची प्रशासनाने शासनाकडे तक्रार करत बदली केली होती. त्या वेळी देखील पाटील यांनी मॅटकडून स्थगिती मिळविली होती.

पाटील यांना पदभर देण्याच्या आदेशानंतर नियमित कामकाजाला सुरवात केली.

महिनाभरात देवरेंनी केलेल्या अनेक कामकाजावर त्यांनी आक्षेप घेतल्याचे बोलले जात आहे. दोघांमधील या शीतयुद्धामुळे विभागातील कर्मचारी पेचात सापडले आहेत.

Nashik ZP
Jal Jeevan Mission : जलजीवनच्या 32 योजनांची कामे कागदावरच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.