Nashik ZP Super 50 : ‘सुपर 50’साठी उद्या मुकाबला! जिल्ह्यातील 23 केंद्रांवर होणार लेखी परीक्षा

Nashik News : जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘सुपर- ५०’ उपक्रमासाठी सात हजार ७०० विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.
nashik zp
nashik zpesakal
Updated on

Nashik News : जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘सुपर- ५०’ उपक्रमासाठी सात हजार ७०० विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. या विद्यार्थ्यांची रविवारी (ता. २१) जिल्ह्यातील २३ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाकडून तयारी पूर्ण झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ व २०२५-२६ या दोन वर्षांसाठी या उपक्रमास एकूण ११० विद्यार्थ्यांची (५५ ‘जेईई’साठी व ५५‘नीट’साठी) उपक्रमाच्या निकषाच्या आधारे निवड होणार आहे. (ZP written exam for Super 50 will be held tomorrow)

ऑनलाइन नोंदणी न झालेले; परंतु थेट परीक्षा केंद्रावर दहावीची गुणपत्रिका घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी दिली जाणार आहे. रविवारी सकाळी अकरा ते दीड या वेळेत ही परीक्षा होईल. चांदवड, निफाड प्रत्येकी तीन, सुरगाणा तालुक्यात चार, मालेगाव- दोन, तर सटाणा, देवळा, नांदगाव, येवला, सिन्नर, कळवण, पेठ, दिंडोरी.

त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक तालुक्यांतील प्रत्येक एक केंद्राचा समावेश आहे. २३ केंद्रांवरील ३१५ वर्गांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार असून, त्यासाठी ३१५ पर्यवेक्षिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक वर्गात २५ विद्यार्थी परीक्षा देतील. गटशिक्षणाधिकारी, केंद्र संचालक यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. (latest marathi news)

nashik zp
Nashik Police : आयुक्तांचा दणका, प्रभारींच्या उचलबांगडी; काही थेट कंट्रोल रूममध्ये

परीक्षा केंद्रावर दहालाच विद्यार्थ्यांना हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. परीक्षेच्या उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका बंद लिफाफ्यात पर्यवेक्षिकांना शनिवारी (ता. २०) दुपारी दिल्या जाणार आहेत. रविवारी परीक्षेनंतर तीनला उत्तरपत्रिका जमा करण्याचे आदेश माध्यमिक विभागाने दिले असल्याचे समन्वयक तथा माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी सांगितले.

तालुकानिहाय विद्यार्थी

निफाड ः ११००, पेठ ः ३०५, सिन्नर ः ३५८, सुरगाणा ः ७०६, त्र्यंबकेश्वर ः २८१, येवला ः ३७८, बागलाण ः ६६७, चांदवड ः ८४५, देवळा ः २९५, दिंडोरी ः ३६९, इगतपुरी ः ३८७, कळवण ः ५६७, मालेगाव ः ५०५, नांदगाव ः २८७, नाशिक ः ६४२.

nashik zp
Nashik Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीची पेरणी; शरद पवार यांच्या उपस्थितीत आज निफाड येथे शेतकरी मेळावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.