Ram Lalla Pran Pratishtha : प्रभू श्रीरामांच्या भक्तीत नाशिककर तल्लीन; शहरात रामनामाचा गजर

ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात अन् साधू- संतांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सोमवारी (ता. २२) रामलल्लांची मंदिरातील गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
Ram Lalla Pran Pratishtha
Ram Lalla Pran Pratishthaesakal
Updated on

Ram Lalla Pran Pratishtha : रामाय तस्मै नमः च्या जयघोषाने अयोध्येत श्री रामलल्ला विराजमान झाले. ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात अन् साधू- संतांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सोमवारी (ता. २२) रामलल्लांची मंदिरातील गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

या ऐतिहासिक सोहळ्याचा जल्लोष संपूर्ण देशभर करण्यात आला. रामनामाच्या गजराने संपूर्ण शहर भक्तिरसात तल्लीन झाले होते. (Nashikkar is engrossed in devotion of Lord Shri Ram nashik news)

शहरात सकाळपासूनच रामनामाचा जयघोष सुरू झाला होता. प्रत्येक मंदिरात फुलांची सजावट अन् भव्य रांगोळी साकारण्यात आली होती. यासह नागरिकांनी घरोघरी, आपल्या आस्थापनांमध्ये, सभागृहांत प्रतिष्ठा सोहळ्याचा उत्सव साजरा केला. लहान बालकांनी प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमानाच्या वेशभूषा साकारल्या होत्या.

अयोध्येतील सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी शहरात ठिकठिकाणी थेट प्रक्षेपणासाठी भव्य एलईडी स्क्रीनदेखील लावण्यात आल्या होत्या. सायंकाळी तर शहरात दिवाळी साजरी झाली.

नाशिककरांनी लावलेल्या लक्ष दिव्यांनी शहर उजळून निघाले. फटाक्यांच्या आतषबाजीने सर्वत्र उत्साहाचे वातावरण झाले होते. एकूणच शहरात श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा न भूतो न भविष्य जल्लोष करण्यात आला.

Ram Lalla Pran Pratishtha
Ram Lalla Pran Pratishtha : एकही नारा, एकही नाम ‘जय श्रीराम’

* श्री काळाराम मंदिरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सोमवारी पहाटेपासून कार्यक्रमांची रेलचेल होती. श्रीरामांच्या महापूजेनंतर सकाळी साडेआठला भजन, कीर्तनात भाविक तल्लीन झाले. सायंकाळी मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. हजारो दिव्यांच्या तेजाने मंदिर परिसरात चैतन्य निर्माण झाले होते.

* शिवसेना ठाकरे गटातर्फे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शहरात आले आहेत. त्यांनीदेखील सायंकाळी श्री काळाराम मंदिरात आरती केली.

* नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे रविवार कारंजा येथे नागरिकांना १५ हजार लाडूंचे वाटप करण्यात आले. तसेच गोदाघाटावर श्रीरामाची भव्य रांगोळी साकारण्यात आली होती.

* महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानमध्ये वेद मंत्र, रामरक्षा पठण करण्यात आले. तसेच राममंदिर निर्माणासाठी कार्य केलेल्या कारसेवकांचा सत्कार करण्यात आला.

Ram Lalla Pran Pratishtha
Ram Lalla Pran Pratishtha : पंचवटी रामायणाची मूळ धरोहर व्हावी

* जुने नाशिकमधील आझाद चौक येथे जय भारत तरुण मित्रमंडळ, जय भवानी मित्रमंडळातर्फे नाशिक इस्कॉन प्रमुख धनराज प्रभू यांचे भक्तिरसातून राष्ट्र निर्माण विषयावर व्याख्यान झाले.

* मनसेतर्फे सकाळी पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते काळाराम मंदिरात आरती करण्यात आली. तसेच शहरभरात ७०० किलोच्या ५१ हजार लाडूंचे वाटप करण्यात आले.

* जेल रोड येथे श्रीराम उत्सव समिती, शिवराज्याभिषेक समिती व परिसरातील विविध संस्थांतर्फे सामूहिक रामरक्षा पठण, महाआरती करण्यात आली. तसेच गायक श्रेयस लोहारीकर व शाहीर मयूर देशमुख यांचा रामगीतांचा कार्यक्रमात भाविकांनी रामनामाचा गजर केला.

* मुक्तिधाम मंदिरात सकाळी महापूजा व मुक्तिधाम ट्रस्ट परिवार, पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके, उपनगर पोलिस ठाण्याचे विजय पगारे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्यानंतर सकाळी ९ ते साडेबारापर्यंत पंडित ओंकार वैरागकर राम भजनांचा कार्यक्रम पार पडला अन् महाप्रसाद वाटप करण्यात आले.

Ram Lalla Pran Pratishtha
Ram Temple Pran Pratishtha : हमनप्रीत कौरलाही मिळालं अयोध्येतील रामलल्लांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यांच निमंत्रण

* गायत्री परिवारातर्फे सायंकाळी ६ पासूनच गायत्री शक्तिपीठ, प्रज्ञापीठ, जनजागरण केंद्र यासह साधकांनी घरोघरी दीपोत्सव साजरा केला.

* तुळजाभवानी मंदिर समितीतर्फे श्रीराम कथा आयोजित करण्यात आली आहे. सोमवारी श्रीराम कथेत राम राज्याभिषेक सोहळा पार पडला.

* अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे रामकुंड ते नारोशंकर मंदिरापर्यंत गोदाघाटावर सायंकाळी २५ हजार दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला, या दिव्यांच्या तेजाने संपूर्ण गोदाघाट परिसर उजळून निघाला.

* डीजीपीनगर येथील विघ्नहर गणेश मंदिरात माजी महापौर सतीश कुलकर्णी व संध्या कुलकर्णी यांच्यातर्फे गीत रामायण व श्रीराम गीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Ram Lalla Pran Pratishtha
Ram Lalla Pran Pratishtha: बॉलीवूडमधील कोणत्या सेलिब्रेटींना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळाले नाहीच!

* सिडको परिसरातील पवननगर मैदानात मुकेश शहाणे यांच्या वतीने ५१ फूट उंच श्रीराम देखावा साकारण्यात आला. तसेच श्रीराम भजन कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते.

* राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे (अजित पवार गट) श्री राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याची साफसफाई करण्यात आली.

* मखमलाबाद येथील श्रीराम मंदिरात भव्य शोभायात्रा व महाप्रसाद वाटप करण्यात आले.

* युवा एकता ग्रुपतर्फे सकाळी पेठ रोड पंचवटी येथील दत्त नगरमध्ये श्रीराम महाआरती व लाडूवाटप करण्यात आले.

Ram Lalla Pran Pratishtha
Ram Lalla Pran Pratishtha : येवल्यात कारसेवकांचा गौरव; रामभजन संध्येत रामभक्त मंत्रमुग्ध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.