Monsoon Temperature: ‘हिट’मुळे नाशिककर त्रस्त! उन्हाची तीव्रता आणखी वाढणार: हवामान विभागाचा अंदाज

Temperature
Temperatureesakal
Updated on

Monsoon Temperature : ऐन पावसाळ्यात पावसानेच पाठ दाखविल्याने शेतकऱ्यांसह सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यातच, गेल्या आठवडाभरापासून कमाल अन्‌ किमान तापमान कमालीचे वाढले आहे.

ऑगस्ट- सप्टेंबरमध्येच नाशिककरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र ऑक्टोबर हिटचा अनुभव घेतो आहे. शेतकरी अजूनही आशेने आकाशात भरून येणाऱ्या ढगांकडे डोळे लावून आहे तर, शहरवासीय दिवसा उन्हाच्या तडाख्याने तर रात्री उकाड्याने हैराण झाले आहेत.

दरम्यान, कमाल तापमानाचे आत्ताच ३३ अंश सेल्सिअसचा पारा पार केला असून, येत्या आठवडाभर कमाल पारा वाढत राहील असा हवामान विभागाचे प्राथमिक अंदाज आहे. (Nashikkar suffering due to hit Heatwave to increase further Meteorological department predicts nashik)

यंदा महाराष्ट्रात प्रमाणापेक्षा सर्वात कमी पावसाची नोंद झालेली आहे. समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झालेले असताना, शहरांवरही पाणीकपातीची टांगती तलवार आहे. एरवी ऑगस्टमध्ये राज्यभर पाऊस असतो.

याच महिन्यात नाशिकचीच नव्हे, तर राज्यभरातील धरणे ओसंडून वाहतात. यंदा राज्यभरातील धरणांमध्ये पाणीसाठा आज पुरेसा असला तरी येत्या काळासाठी पुरेसा नाही. त्यामुळे राज्यावर पाण्याचे संकट येण्याची शक्यता आहे.

त्यातच, गेल्या आठवडाभरापासून राज्यातून पावसाने काढता पाय घेतला आहे. पाऊस नाही परंतु आठवडाभरात कमाल तापमानामध्ये तीव्रतेने वाढ झाली आहे. नाशिकचा कमाल पारा ३३ अंश सेल्सिअस पलिकडे पोचले आहे.

अगदी उन्हाळ्यासारखी परिस्थिती नाशिककर अनुभवत आहेत. दिवसाच्या कमाल तापमानामुळे उष्णता वाढली आहे.

तर दुसरीकडे रात्रीचे किमान तापमानही वाढले असून, २१ अंश सेल्सिअस नोंदले जात आहे. त्यामुळे रात्रीचा उकाडा वाढला आहे. एरवी ऑक्टोबरमध्ये उष्णता वाढत असते. परंतु आता ऑगस्ट-सप्टेंबरमध्येच नाशिककर ऑक्टोबर हिटचा अनुभव घेत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Temperature
Monsoon Temperature Rise: तापमानात वाढ; बसतोय उन्हाचा चटका! पावसाळ्यात घामाच्या धारा

काळजी घ्या..

- शरीरातील पाण्याची पातळी कमी होण्याची (डिहायड्रेशन) शक्यता असल्याने पुरेसे पाणी प्यावे

- वातावरणातील बदलामुळे सर्दी-खोकल्याची शक्यता. फ्रीजमधील थंड पाणी पिणे टाळावे

- बाहेरील कोल्ड्रिंक्सच, थंड पदार्थ खाणे टाळावे

- मलेरिया, डेंगीची साथ सुरू असल्याने दूषित पाणी, डासांपासून सावधगिरी बाळगावी

- डोळ्यांची साथ सुरू असून उष्णतेपासून डोळ्याची काळजी घ्यावी

"ऑक्टोबर हिटसदृश्य सध्याची परिस्थिती आहे. वातावरणातील या बदलाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. भरपूर पाणी प्यावे. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यावी."

- डॉ. प्रतीक भांगरे, एम.डी. जिल्हा रुग्णालय.

कमाल व किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये

तारीख .....कमाल.......किमान तापमान

१ सप्टेंबर....३३.२........२१.६

३१ ऑगस्ट..३१.७........२०.०

३० ऑगस्ट..३०.८.......२०.०

२९ ऑगस्ट..२९.२........२१.१

२८ ऑगस्ट..२९.२........२१.१

२७ ऑगस्ट..२७.९........२१.८

Temperature
Ganeshotsav 2023: गणेशोत्सवावर सीसीटीव्हीची नजर! मुख्य रस्ते, चौकात 80 कॅमेरे कार्यान्वित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()